खोबऱ्याचे तेल केसांना लावण्याचे फायदे:
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्रतेचा परिणाम त्वचेसोबत केसांवर सुद्धा दिसून येतो. या दिवसांमध्ये केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे केसांसंबधित समस्या उद्भवतात. अशावेळी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रोटीन ट्रीटमेंट करतात. मात्र या प्रोटीन ट्रीटमेंट फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. त्यामुळे केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, कॅल्शियम युक्त पदार्थ इत्यादी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर टाळूवर सतत खाज येऊ लागते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर केस गळतात. याशिवाय टाळू पूर्णपणे रखरखीत होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी हेअर केअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती हेअर मास्क तयार करण्याची सोपी कृती सांगितली आहे. यामुळे तुमच्या टाळूवरील कोंडा कमी होईल आणि केसगळतीच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. या हेअर मास्कचा वापर केल्यामुळे केस मजबूत राहून कोंडा कमी होतो.
हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये आल्याचा रस घेऊन त्यात खोबऱ्याचे तेल मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर केसांचे दोन भाग करून केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत संपूर्ण केसांवर तयार केलेला घरगुती हेअरमास्क लावून केस 10 ते 15 मिनिटं हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज करून झाल्यानंतर काहीवेळ केस तसेच ठेवा. नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास केसांची वाढ निरोगी होईल आणि केसांचे गळणे थांबेल.
घाणीमुळे काळा झालेला कंगवा स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, होईल नव्यासारखा चमकदार
पूर्वीच्या काळापासून खोबऱ्याच्या तेलाचा वापर जेवणासोबतच केसांच्या वाढीसाठी सुद्धा केला जात आहे. खोबऱ्याच्या तेलाने केसांमध्ये मसाज केल्यास टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. यामुळे केस तुटणार नाही. आल्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. आल्यामध्ये अॅंटीफंगल, अॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे टाळूवरील इन्फेक्शनचा धोका कमी होतो. कोंडा कमी करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात तुम्ही आल्याची पावडर सुद्धा मिक्स करून लावू शकता.