घशात वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात अनेक बदल झाले आहेत. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय साथीच्या आजारांची झपाट्याने पसरू लागतात. सर्दी, खोकला किंवा आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. सतत होणाऱ्या सर्दीमुळे घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे किंवा जेवताना त्रास होण्याची शक्यता असते. बाहेरील तिखट किंवा मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे खोकला वाढण्याची शक्यता असते. वारंवार येणाऱ्या खोकल्यामुळे घशात जळजळ होणे, खोकला येऊन घशातून रक्त येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. सर्दी, खोकला झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, तर काही लोक मेडिकलच्या गोळ्या औषधांचे सेवन करतात.(फोटो सौजन्य – istock)
खोकल्यामुळे सोलवटलेला घासा बरा करण्यासाठी मेडिकलच्या गोळ्या औषधांचे सेवन न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा. घरगुती उपाय केल्यामुळे तात्काळ आराम मिळतो. यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे कोमट किंवा घशाला सहन होईल अशा पाण्याने गुळण्या करणे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशाला आलेली सूज कमी होते. तसेच घशात वाढलेले जंतू नष्ट होण्यास मदत होते. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या दिवसभरातून दोन ते तीन वेळा केल्यास खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
वारंवार खोकला वाढल्यानंतर रात्री झोपताना एक ग्लास गरम केलेल्या दुधात चिमूटभर हळद टाकून प्यावे. हळदीचे दूध प्यायल्यामुळे घशात वाढलेली खवखव, घशाला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेले गुणधर्म घशात वाढलेली खवखव आणि सूज कमी करतात. हळदीतील अँण्टीसेप्टिक गुणधर्म घशात वाढलेली जळजळ कमी करून शांत झोप लागते. खोकल्यामुळे तुमच्या घशाला सतत सूज येत असेल तर आलं आणि तुळशीच्या काढ्याचे सेवन करावे. एक ग्लास पाण्यात तुळशीची पाने, आल्याचा तुकडा, थोडी काळीमिरी आणि गवती चहा घालून पाणी अर्धे होईपर्यंत उकळवून घ्या. तयार केलेले पाणी गाळून त्यात थोडस मध घालून सेवन केल्यास सर्दी खोकला कमी होईल.
डोळ्यांची कमी झालेली नजर होईल तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कायमचा घालवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ
एक चमचा मधात थोडासा आल्याचा रस मिक्स करून चाटण तयार करावे. तयार केलेले चाटण दिवसभरात दोन ते तीन वेळा घेतल्यास खोकल्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. वारंवार सर्दी किंवा खोकला होत असल्यास ओवा किंवा गरम पाण्याची वाफ घ्यावी. याशिवाय गरम पाण्यात मिंट ऑईल टाकून वाफ घेतल्यास सर्दी, खवखव दूर होण्यास मदत होईल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अतिथंड आणि बर्फाचे पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये. गरम सूप, मूगडाळीचे वरण, खिचडी, तूप इत्यादी पोषक आहार घ्यावा.
घशाचा संसर्ग म्हणजे काय?
घशाचा संसर्ग म्हणजे घशाच्या मागील भागाला (फॅरिंक्स) किंवा टॉन्सिल्सना होणारी सूज किंवा जळजळ. हे विषाणू (व्हायरस) किंवा जीवाणू (बॅक्टेरिया) मुळे होऊ शकते.
घशाच्या संसर्गाची लक्षणे काय आहेत?
घसा खवखवणे, दुखणे किंवा खाज येणे, गिळताना त्रास होणे, ताप येणे, नाक वाहणे किंवा सर्दी, खोकला, मानेतील लिम्फ नोड्स (गाठी) सुजणे, आवाज कर्कश होणे.
घशाचा संसर्ग कसा पसरतो?
खोकल्यातून किंवा शिंकळ्यातून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्मजंतूंनी (जंतूंनी) हवेत पसरून, दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे, दूषित वस्तूंच्या (जसे की, दरवाजाचे हँडल) संपर्कात आल्याने.