फोटो सौजन्य - Social Media
भारतात अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. अशामध्ये भारतात अनेक कथा अशा प्रसिद्ध आहेत ज्या भुताटकीने भरल्या आहेत. भुताटकीच्या भरलेल्या या कथा सत्य असण्याचा दावा काही जण करत असतात. भारतात अनेक भुतांचे प्रकार आढळतात. कोकणात तर देवचार, राखणदार, गिर्या तसेच बायांग असे अनेक भुतं आढळतात. ही झाली देसी भुतं! आपलीच आपल्या मातीतले भुतं! पण इतर देशांमध्येही भुतांचे वेगवेगळे प्रकार आढळून येतात, याबद्दल ठाऊक आहे का?
Vengeful Ghost
चीन देशातील ही भुतं अन्यायकारक, क्रूर किंवा अकाली मृत्यूमुळे मृत्यू झाल्याने भटकत राहतात. ही आत्मा स्वतःच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लोकांच्या मागे लागते. काही संस्कृतींमध्ये, मृत व्यक्तीला योग्य अंत्यसंस्कार न दिल्यास त्याचा आत्मा अशांत राहतो आणि तो ‘Vengeful Ghost’ म्हणून भटकत राहतो.
Egg Ghost
कोरियात ‘डलग्याल गुशिन’ या नावाने ओळखले जाणारे हे भूत अंड्यासारखे दिसते. या भुताला ना डोळे असतात, ना नाक असतात आणि नाही तोंड असते. या भुताला कोणतीही मानवी ओळख नसते. भुतं अंड्यासारखा असला तर अनेकांना गंमत वाटत असेल पण खरं तर जो कुणी याला पाहतो त्याचा अंत होतो.
युरेई
जपानी लोककथांतील हे भूत पश्चिमेकडील भुतांसारखेच मानले जाते. ‘युरेई’ हा शब्द दोन अक्षरांपासून बनलेला आहे. त्यातील यु म्हणजे अंधुक तर रेई म्हणजे आत्मा. ही भुते मृत्यूनंतर शांती न मिळाल्यामुळे पृथ्वीवर अडकलेली आत्मा असते. त्यांचं रूप वेडसर, पांढऱ्या साडीतील आणि विस्फारलेल्या डोळ्यांचं असतं.
हॉर्टदान
तुर्किक पुराणकथांमध्ये हॉर्टदान म्हणजे मृत व्यक्तीचा त्रस्त आत्मा जो थेट थडग्यातून परत येतो. हे भूत रक्त शोषून जीवशक्ती काढून घेतं. काही हॉर्टदान जिवंत व्यक्ती असू शकतात ज्यांच्याकडे जादूई शक्ती असते. ते अदृश्य होऊ शकतात, प्राणी बनू शकतात आणि अमरत्व प्राप्त करू शकतात. जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये भुतांचे अनोखे, भयावह प्रकार आढळतात. मग ती कोकणातली राखणारी असो किंवा कोरियाची अंडे-भूत, प्रत्येक भुताची एक स्वतंत्र कथा आहे गूढ, रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारी!