त्वचेवर आलेले पिंपल्स, सुरकुत्या घालवण्यासाठी सॉल्ट स्क्रबचा करा वापर
वातावरणात सतत होणारे बदल, चुकीची जीवनशैली, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेला पाण्याचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. आरोग्यासोबतच त्वचेचे नुकसान होऊन सुरुवात होते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा फोड येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे संपूर्ण त्वचा खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा त्वचा पुन्हा पहिल्यासारखी होत नाही. अनेक महिला त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. मात्र याचा फारसा फायदा दिसून येत नाही. त्यामुळे केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सॉल्ट स्क्रबचा वापर कसा करायचा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सॉल्ट स्क्रब म्हणजे मिठापासून तयार केलेले स्क्रब. हे स्क्रब तुम्ही घरच्या घरीसुद्धा तयार करू शकता. यासाठी घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थ त्वचेवर नैसर्गिक सौदंर्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. स्क्रब लावल्यामुळे त्वचेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते आणि चेहरा उजळण्यास मदत होते. त्वचेवरील पिंपल्सचे डाग निघून गेल्यानंतर त्वचा स्वच्छ होते. चला तर जाणून घेऊया सॉल्ट स्क्रब वापरण्याचे फायदे.
अंघोळ केल्यानंतर सॉल्ट स्क्रब हातांच्या साहाय्याने त्वचेवर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत हात गोलाकार त्वचेवर फिरवा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल. त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतील.शिवाय नाकावर आलेले ब्लॅकहेड्स स्क्रब करून निघून जातील. आठवड्यातून दोनदा तुम्ही त्वचेसाठी सॉल्ट स्क्रबचा वापर करू शकता.
स्क्रब केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. शिवाय स्क्रब घरच्या घरी कमी साहित्यामध्ये लगेच तयार करता येते. यासाठी लिंबाच्या रसामध्ये एक चिमूटभर सॉल्ट स्क्रब टाकून घरी स्क्रब तयार करा. त्यानंतर चेहऱ्यावर स्क्रब लावून चोळा.५ मिनिटं हलक्या हाताने मसाज केल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक जास्त टॅन होऊन जाते. त्वचा टॅन झाल्यानंतर चेहरा काळवंडलेला दिसू लागतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी स्क्रब तयार करून त्वचेवर लावू शकता. यासाठी मधामध्ये थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर संपूर्ण त्वचेवर तयार केलेले मिश्रण लावून त्वचा हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल. त्यानंतर पाण्याने त्वचा धुवून घ्या.