चांदीचे दागिने परिधान केल्यामुळे आरोग्याला होतात 'हे' प्रभावी फायदे
भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना विशेष महत्व आहे. दागिने केवळ सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी ठरतात. महिला सोनं, चांदी, प्लॅटिनम, डायमंड इत्यादी अनेक वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले दागिने अंगावर परिधान करतात. पूर्वीच्या काळी महिला अंगठ्या, बांगड्या, पैंजण असे विविध चांदीचे दागिने परिधान करायच्या. हीच परंपरा अजूनही आहे. शरीरावर चांदीच्या धातूपासून बनवलेले दागिने परिधान केल्यामुळे आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. चांदीची अंगठी शास्त्रीय आणि आयुर्वेदिक कारणे सुद्धा आहेत. चांदीचे दागिने परिधान केल्यामुळे मन:शांती, मानसिक तणाव, निद्रानाश, चिडचिड, थकवा इत्यादी अनेक समस्यांपासून कायमची सुटका मिळेल. त्यामुळे अंगावर एकतरी चांदीचा दागिना परिधान करावा.(फोटो सौजन्य – pinterest)
चांदीचे दागिने परिधान केल्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते, असे अनेकदा म्हंटले जाते. चांदीची अंगठी घालणे ही अंधश्रद्धा नसून ही एक नैसर्गिक थेरेपी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चांदीचे दागिने परिधान केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चांदीच्या धातूची अंगठी योग्य प्रकारे वापरल्यास आणि अचूक बोटात घातल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
हातामध्ये चांदीच्या धातूची अंगठी परिधान केल्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय चांदीचा धातू शरीरासाठी अतिशय थंड मानला जातो. हातामध्ये चांदीची अंगठी घातल्यामुळे मेंदूवरील दडपण कमी होते, चिंता तणाव कमी होण्यास मदत होते. शरीरात ऊर्जा संतुलित राहण्यासाठी आणि मन शांत राहण्यासाठी चांदीच्या धातूची हातामध्ये अंगठी घालावी. ऑफिसमधील तणाव, घरातील जबाबदाऱ्या इत्यादी अनेक समस्यांमुळे मन निर्माण झालेला तणाव कमी होण्यास मदत होते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा परिणाम झोपेवर लगेच दिसून येतो. यामुळे बऱ्याचदा झोपेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे सतत तणाव, अस्वस्थता, चिंता वाढण्याची शक्यता असते. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हातामध्ये चांदीच्या धातूची अंगठी परिधान करावी. थकवा, चिडचिड, ऊर्जा कमी होणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चांदीची अंगठी प्रभावी ठरेल.
लघवी करताना सतत होणारी जळजळ असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष न करता आरोग्याची घ्या काळजी
चांदी आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. चांदीची अंगठी हातामध्ये घातल्यामुळे मुरुम, घामोळ्या, त्वचारोग इत्यादीचे प्रमाण कमी होते. याशिवाय अंगठी घातल्यामुळे नाडीमार्गांवर थेट परिणाम होतो आणि शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेत वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी चांदीची अंगठी प्रभावी आहे.