लहान मुलांना डब्यात द्या कुरकुरीत पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरमुऱ्यांचे लाडू, नोट करून घ्या रेसिपी
महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे मुरमुऱ्यांचे लाडू. हे लाडू लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. लहान मुलांच्या हातात एक मुरमुऱ्यांचा लाडू दिल्यानंतर मुलं लाडू खात शांत बसून राहतात. मुरमुरे चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा पौष्टीक आहे. लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर त्यांना खाण्यासाठी मुरमुऱ्यांचे लाडू देऊ शकता. हे लाडू गुळाचा वापर करून बनवले जातात. वयाच्या ५ ते १५ वर्षांपर्यंत मुलांचा शरीराचा विकास होतो. पण बऱ्याचदा मुलांना नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर बाहेरील विकतचे पदार्थ खाण्यास हवे असतात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्यास दिल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे लहान मुलं सतत आजारी पडतात. शारीरिक दृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे शरीराचा व्यवस्थित विकास होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या आवडीचे मुरमुऱ्यांचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – pinterest)
२६ जानेवारीचा दिवस गोड बनवायचाय? तर मग घरी बनवा मऊसूत ‘गाजर पाक’, झटपट तयार होते रेसिपी






