आजीबाईच्या स्वयंपाक घरातील सीक्रेट रेसिपी! शिळ्या भाजीपासून ५ मिनिटांमध्ये बनवा गरमागरम टेस्टी पराठे
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात शिल्लक राहिलेली भाजी एकत्र फेकून दिली जाते किंवा चपातीसोबत खाल्ली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भाजीपासून पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पराठा हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडतो. पराठा तुम्ही लोणचं, दही किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून कायमच नवनवीन पदार्थ बनवले जातात. पण लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना वेगवेगळ्या भाज्या आणि शिल्लक राहिलेली भाजीचा वापर करून पराठा बनवू शकता. वेगवेगळे मसाले, भाजी आणि गव्हाच्या पिठाचे कणिक वापरून तयार केलेला पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया शिल्लक राहिलेल्या भाजीपासून पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
हेल्दी पण टेस्टी रेसिपी! सकाळचा नाश्ता होईल आणखीन मजेदार, थंडीत घरी बनवा गुजराती स्टाईल ‘मेथी थेपला’






