फोटो सौजन्य: Pinterest
उंच आणि सडपातळ शरीर प्रत्येकालाच पाहिजे असतं. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि सतत बाहेरच्या खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढायला सुरुवात होते. यामुळे वजन वाढणं, तसंचं हृदयावर ताण येणं पित्त वाढणं अशा समस्या उद्धभवतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी वर्क आउट, योगा आणि डाएट करतात मात्र हे एवढं तुमचं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी पुरेसं आहे का ? तर याचं उत्तर तज्ज्ञ नाही असं देतात. वजन कमी करण्यासाठी शारीरिक हलचाल योग्य आहार याचबरोबर महत्त्वाचं आहे ते तुमचं मानसिक स्वास्थ. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी किंवा शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय विचार करता हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कसं ते जाणून घेऊयात.
तुम्हाला जर रोजच्या रोज वर्क आऊट आणि किंवा डाएट करणं शक्य नसेल तरी तुम्ही तुमच्या विचारांनी देखील तुमचं वजन कमी करु शकता हे विज्ञान सांगत. आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी याबाबात एका युट्यूब चॅनेलच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. असं म्हणतात की शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. दिवसभरात मेंदूमध्ये असंख्य विचार येतात. त्यामुळे तुम्ही ताण तणावात असाल तर याचा परिणाम शरीरावर देखील दिसून येतो. म्हणून योग्य आहार याशिवाय मानसिक स्वास्थ्यदेखील तितकंच महत्वाचं आहे.
आपण जो विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडतं. त्यामुळे तुमचं तुमच्या विचारांवर नियंत्रण असायला हवं. याबाबत सांगताना आरोग्य तज्ज्ञ मानसी मेहेंदळे म्हणताता की, वजन कमी करण्यासाठी मेंदूला सकारात्मक विचारांची गरज असते. बऱ्याचदा तुम्ही घेत असलेल्या तणावामुळे शरीरावर सूज यायला लागते. अतिरिक्त ताण तणावामुळे अनेक जण कमी वयातचं खूप जास्त वयाने दिसू लागतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं रोज मनाला आणि मेंदूला अतिरिक्त ताण तणावापासून लांब ठेवा. सकारात्मकता वाढवण्यासाठी रोज आवडीचं गाणं ऐका. यामुळे शरीरात चांगल्या हार्मोनल्सचं कार्य सुधारतं. तसंच माझं वजन कमी झालंय आणि मी खूप सुंदर दिसत आहे. मी सगळ्या शारीरिक व्य़ाधींपासून मुक्त आहे. असा सकारात्मक विचार केल्यास खरंच तसं घडायला सुरुवात होते, हे विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे. त्यामुळे तुम्ही ही जर वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्या मेंदूला तुम्ही बारिक झाले आहात तुमचं वजन कमी झालं आहे, असं संकेत द्यावे लागतात आणि याने देखील वजन कमी होण्यास मदत होते.