डोळ्यांभोवती वाढलेले डार्क सर्कल्स कमी करण्यसाठी 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला ताण, अपुरी झोप, जनक फूडचे अतिसेवन, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. अपुऱ्या झोपेचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येणे, त्वचा काळवंडलेली वाटणे,पिंपल्स किंवा त्वचेवर डाग येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचा निस्तेज दिसू लागते. डोळ्यांखाली आलेले डार्क सर्कल्स घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा डोळ्यांखाली आलेले काळे डाग जात नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला हानिकारक रसायनांपासून बनवलेल्या क्रीमचा किंवा इतर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा डोळ्यांखाली आलेले डार्क सर्कल्स लवकर कमी होत नाहीत. डार्क सर्कल्स आल्यामुळे बऱ्याचदा डोळे सुजल्यासारखे वाटू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी मदत करतात. घरगुती उपाय त्वचेवर नैसर्गिक चमक देतात.
डार्क सर्कल्स घालवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटा घेऊन त्याच्या वरील साल काढून घ्या. त्यानंतर बटाटा किसून काहीवेळ पाण्यात ठेवा. त्यानंतर अर्धा तासाने त्यातील सर्व स्टार्च वाटीच्या तळाशी साचून राहील. तो काढून कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित सुकवून घ्या. त्यानंतर कडकडीत सुकलेल्या बटाट्याची बारीक पावडर तयार करून घ्या. वाटीमध्ये त्यात केलेली पावडर घेऊन त्यात गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट डोळ्यांच्या खाली लावून १५ मिनिटं तशीच ठेवा. यामुळे डोळ्यांखाली आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा लेप डोळ्यांभोवती लावल्यास डोळे चमकदार आणि सुंदर दिसतील.
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आजपासूनच करा ‘हा’ प्रभावी उपाय, त्वचा कायमच राहील चमकदार
वाटीमध्ये तयार केलेली बटाट्याची पावडर घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण डोळ्यांच्या खाली लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे तुमचे डोळे सुंदर आणि चमकदार दिसतील. हा उपाय नियमित केल्यास डोळ्यांच्या खालील त्वचा उजळण्यास मदत होईल. लिंबाच्या रसात असलेले गुणधर्म काळे डाग घालवण्यासाठी प्रभावी ठरतात.