• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Is The Relationship Between Monsoon And Kidney Diseases

मान्सून आणि किडनी आजारांमध्ये नेमका संबंध काय?

Kidney Disease: पावसाळ्यात अनेक आजार वाढतात आणि यामध्ये किडनीचे आजारही पटकन वाढताना दिसून येतात. पावसाळ्याचा आणि किडनीचे आजार वाढण्याचे नेमका काय संबंध आहे याबाबत आपण या लेखातून जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 17, 2024 | 02:05 PM
पावसाळ्यात किडनीच्या आजारांमध्ये होते वाढ

पावसाळ्यात किडनीच्या आजारांमध्ये होते वाढ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्व ऋतूंमध्ये ज्याची सर्वाधिक असोशीने वाट पाहिली जाते असा ऋतू म्हणजे पावसाळा. मात्र योग्य काळजी आणि खबरदारी घेतली गेली नाही तर या दिवसांत अनेक आरोग्यसमस्या निर्माण होऊ शकतात, ज्यातील काही समस्यांचा व्यक्तीच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. मान्सूनच्या काळात किडनीच्या समस्यांमध्ये अचानक वाढ झालेली दिसून येते, आणि यातील काही सर्वसामान्य समस्या खालीलप्रमाणे लेखात देण्यात आल्या आहेत. 

फोर्टिस नेटवर्क हॉस्पिटल असलेल्या वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी विभागाचे डिरेक्टर आणि कन्सस्टन्ट-ट्रान्सप्लान्ट फिजिशियन डॉ. अतुल इंगळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.  (फोटो सौजन्य – iStock) 

अक्युट किडनी इन्ज्युरी (AKI)

किडनीचे कार्य अचानकपणे मंदावणे; जंतूसंसर्ग, डीहायड्रेशन अर्थात शरीरातील आर्द्रतेची पातळी खाली जाणे आणि विषबाधा यांसारख्या अनेक कारणांमुळे AKI ही समस्या निर्माण होऊ शकते. ही स्थिती मान्सूनच्या काळात सर्वत्र अधिक प्रमाणात आढळून येते, कारण या दिवसांत लोकांचा दूषित पाणी व अन्नाशी संपर्क येतो. AKI च्या लक्षणांमध्ये थकवा जाणवणे, अतिसार वा डायरिया, डीहायड्रेशन आणि झोपाळल्यासारखे वाटणे या तक्रारींचा समवेश होतो. 

लेप्टोस्पायरोसिस

बॅक्टेरिया संसर्गाचा एक प्रकार असलेला लेप्टोस्पायरोसिस हा आजार सर्वसाधारणपणे दूषित पाणी किंवा मातीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. त्वचा, डोळे, नाक किंवा तोंडावर कापल्यामुळे झालेल्या भेगा किंवा ओरखड्यांच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया शरीरामध्ये शिरू शकतात. लेप्टोस्पायरोसिसच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि उलट्या यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे किडनी निकामी होऊ शकते. 

डेंगू 

डेंग्यूच्या किडनीवर परिणाम

डेंग्यूच्या किडनीवर परिणाम

डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू या विषाणूजन्य आजारामुळे ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी किंवा अंगावर चट्टे उठणे अशी लक्षणे दिसू शकतात. डेंग्यूच्या् बहुतांश रुग्णांवर औषधांच्या सहाय्याने घरच्याघरीच उपचार करता येतो, काही प्रकरणांमध्ये मात्र डेंगूमुळे तीव्र स्वरूपाच्या गुंतागुंती उद्भवू शकतात. जसे की डेंग्यू हेमरहेजिक तापामुळे किडनी खराब होऊ शकते. 

टायफॉइड

दूषित अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून पसरणारा हा एक बॅक्टेरियल संसर्ग आहे. टायफॉइड बॅक्टेरिया रक्तप्रवाहातून पसरतो, ज्यामुळे तो प्रचंड धोकादायक आणि प्राणघातक ठरू शकतो. बॅक्टेरियम साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे टायफॉइड होतो, ज्याच्या अनेक लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि थकवा यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये टायफॉइडमुळे किडनी निकामी होऊ शकते.

पावसाळी आजार झालेल्या व्यक्तींपैकी प्रत्येकालाच किडनीच्या समस्या जाणवत नाहीत ही महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवायला हवी. मात्र आधीपासूनच किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकार यंत्रणा ही नाजूक बनलेली असते, ज्यामुळे अशा व्यक्तींना वरील पावसाळी आजारांची लागण झाली तर त्यांच्याबाबतीत किडनीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता तुलनेने अधिक असते. 

CKD शी संबंधित काही पावसाळी आजार कोणते? 

ज्या स्थितीमध्ये किडन्यांची रक्तामधून अशुद्ध तत्त्वे फिल्टर करण्याची क्षमता नष्ट होते अशा स्थितीला क्रॉनिक किडनी डिजिज किंवा CKD असे म्हणतात आणि या समस्येमुळे व्यक्तीला हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका संभवू शकतो. या स्थितीमध्ये रक्तातील विषद्रव्ये इतर अवयवांना आणि उतींना हानी पोहोचवू शकतात. 

कोणत्या आजारांचा समावेश 

विविध तापांचा परिणाम

विविध तापांचा परिणाम

  • डायरिया: डायरियामुळे डीहायड्रेशन होते, जे CKD असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. या स्थितीमुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये पोषक घटक शोषले जाणे अवघड बनते, ज्यामुळे किडनीला अधिकच हानी पोहोचते
  • मलेरिया: मलेरिया हा एक डासांद्वारे फैलावणारा आजार आहे, जो CKD असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. यामध्ये ताप, हुडहुडी भरणे आणि इतर लक्षणे आढळून येतात. या आजारामुळेही, विशेषत: CKD असलेल्या लोकांच्या किडन्यांना हानी पोहोचू शकते
  • टायफॉइडचा ताप: बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणाऱ्या टायफॉइड आजाराच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, मळमळणे, अशक्तपणा आणि पोटात दुखणे यांचा त्रास होतो, विशेषत: CKD ग्रस्त लोकांना याचा त्रास होतो
  • हेपटायटिस ए: हेपटायटिस ए या विषाणू संसर्गामुळे यकृत अर्थात लिव्हर खराब होऊ शकते. हा आजार विशेषत: CKD असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो, कारण त्यांच्या किडन्या खराब झालेल्या यकृताने उत्सर्जित केलेल्या विषद्रव्यांना फिल्टर करण्यास असमर्थ ठरू शकतात
  • हेपटायटिस बी: हेटायटिस बी या विषाणू संसर्गामुळेही लिव्हर खराब होऊ शकते. हेपटायटिस ए प्रमाणेच हा आजारही CKD असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो
लक्षात ठेवा 

तुम्हाला कोणत्याही पावसाळी आजाराची लक्षणे जाणवत असतील तर तत्काळ डॉक्टरांची भेट घेणे अत्यावश्यक आहे. लक्षात ठेवा लवकरात लवकर केलेले निदान आणि उपचार यामुळे किडनी निकामी होण्यासह इतर गंभीर गुंतागूंतींना प्रतिबंध होण्यास मदत होते. या ऋतूमध्ये किडनीचे संरक्षण करण्यास मदत करणाऱ्या काही इतर उपाययोजना पुढीलप्रमाणे

कशी काळजी घ्याल

कशी काळजी घ्याल

  • भरपूर द्रवपदार्थ घेतल्याने डीहायड्रेशनला प्रतिबंध करण्यास खूप मदत होऊ शकते
  • साचलेल्या पाण्यात पोहणे किंवा असे पाणी पिणे टाळणे
  • आपले हात साबण व पाण्याने वरचेवर धुणे
  • किटकांना दूर ठेवणारी इन्सेक्ट रिपेलंट वापरल्याने मलेरिला आणि इतर आजार संक्रमित करणारे डासांच्या चाव्यापासून संरक्षण मिळण्यास मदत होते
  • अन्न व्यवस्थित शिजवणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण ही अन्नात असू कोणत्याही घातक बॅक्टेरियाला मारण्याची एक परिणामकारक पद्धत आहे
  • आजारी व्यक्तींचा संपर्क टाळणे 
  • तुम्ही औषध घेत असाल तर डॉक्टरांच्या सूचनांनुसार ती घेण्याची काळजी घ्यायला हवी
  • लसीकरणामुळे या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. 
तुम्हाला AKD किंवा CKD यातील कोणत्याही प्रकारचा किडनी आजार असल्यास वरील लक्षणांवर लक्ष ठेवा आणि त्यातील कोणतीही लक्षणे जाणवू लागल्यास विशेषज्ज्ञांची मदत घ्या. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्यातून लगेचच गंभीर संसर्ग होऊ शकतो तसेच या आजारांवर लवकरात लवकर उपचार करणे हे किडनीची अधिक हानी टाळण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.

Web Title: What is the relationship between monsoon and kidney diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 02:05 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’
1

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे
2

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

अन्न पोटातच सडतंय का? 5 लक्षणं समजून घ्या, 6 पद्धतीने काढा आतड्याला चिकटलेली घाण
3

अन्न पोटातच सडतंय का? 5 लक्षणं समजून घ्या, 6 पद्धतीने काढा आतड्याला चिकटलेली घाण

Pregnancy Tips: गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक संबंधांनंतर अर्धा तास तसंच झोपणं गरजेचे आहे का? काय आहे तथ्य
4

Pregnancy Tips: गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक संबंधांनंतर अर्धा तास तसंच झोपणं गरजेचे आहे का? काय आहे तथ्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाविकास आघाडीत बिघाडी, तर महायुतीतही बेबनाव; सांगलीत नेमकं घडतंय काय?

महाविकास आघाडीत बिघाडी, तर महायुतीतही बेबनाव; सांगलीत नेमकं घडतंय काय?

Dec 30, 2025 | 06:55 PM
‘हा’ बॉलीवूड सुपरस्टार नवा डॉन, Ranveer Singhचा पत्ता कट, Don 3 चित्रपटाबद्दल मोठी अपडेट

‘हा’ बॉलीवूड सुपरस्टार नवा डॉन, Ranveer Singhचा पत्ता कट, Don 3 चित्रपटाबद्दल मोठी अपडेट

Dec 30, 2025 | 06:53 PM
WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘ही’ स्टार खेळाडू सामील! तर RCB ला मोठा झटका; अष्टपैलू एलिस पेरीची माघार 

WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘ही’ स्टार खेळाडू सामील! तर RCB ला मोठा झटका; अष्टपैलू एलिस पेरीची माघार 

Dec 30, 2025 | 06:47 PM
Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

Dec 30, 2025 | 06:43 PM
बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना! आणखी एका हिंदूची हत्या; युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना! आणखी एका हिंदूची हत्या; युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Dec 30, 2025 | 06:34 PM
समर रिसर्च फेलोशिप प्रोग्राम (SRFP) २०२६ अंतर्गत मोठी संधी! आताच करून घ्या अर्ज

समर रिसर्च फेलोशिप प्रोग्राम (SRFP) २०२६ अंतर्गत मोठी संधी! आताच करून घ्या अर्ज

Dec 30, 2025 | 06:33 PM
Number Plate चा रंग वेगवेगळा का असतो? लष्करापासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंत, कोणासाठी कोणता रंग योग्य?

Number Plate चा रंग वेगवेगळा का असतो? लष्करापासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंत, कोणासाठी कोणता रंग योग्य?

Dec 30, 2025 | 06:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM
THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

Dec 30, 2025 | 03:33 PM
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM
Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Dec 29, 2025 | 07:23 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM
Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Dec 29, 2025 | 06:36 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.