कोणते केळं आहे अधिक पौष्टिक
केळी हे प्रत्येक ऋतूत सहज उपलब्ध होणारे फळ आहे आणि सर्व वयोगटातील लोकांना ते आवडते. हे केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिकतेनेदेखील परिपूर्ण आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की केळीचेही वेगवेगळे प्रकार आणि रंग आहेत. होय, तुम्हाला भारतात पिवळ्या, लाल आणि निळ्या रंगाची केळी मिळतील. पण त्यापैकी कोणते केळं अधिक पौष्टिक आहे? याबाबत आपण या लेखातून माहिती घेऊया.
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी बोललो, ज्यांनी या तीन प्रकारच्या केळ्यांचे फायदे आणि पौष्टिक पातळीबद्दल माहिती दिली. जाणून घ्या सविस्तर माहिती (फोटो सौजन्य – iStock)
कोणते केळे जास्त पौष्टिक आहे?
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. रिमी सेन यांच्या मते, पौष्टिकतेच्या बाबतीत लाल आणि निळी केळी पिवळ्या केळ्यांपेक्षा किंचित जास्त फायदेशीर ठरू शकतात. पण तुम्ही केळी कोणत्या उद्देशाने खात आहात यावर ते पूर्णपणे अवलंबून आहे. पिवळी केळी ऊर्जेसाठी, लाल केळी रोगप्रतिकारशक्तीसाठी आणि निळी केळी पचनासाठी उत्तम असतात. तुमच्या शरीराला यापैकी कोणत्या गोष्टीची अधिक गरज आहे त्यानुसार केळ्यांचा फायदा ठरत असतो असे आहारतज्ज्ञांनी स्पष्ट केले. या तिन्ही केळ्यांचे फायदे आपण जाणून घेऊया.
केळी आणली की लगेच काळी पडतात? मग ही ट्रिक वापरून पहा, आठवडाभर राहतील फ्रेश
पिवळी केळी : घरातील प्रत्येकाला आवडणारी

पिवळ्या केळ्यातील पौष्टिकता
सर्वात सामान्य आणि सर्वत्र उपलब्ध असणारी केळी पिवळ्या रंगाची आहेत. हे ऊर्जा बूस्टर म्हणून ओळखले जाते आणि त्वरीत ऊर्जा प्रदान करण्यासाठी पिवळ्या केळ्याचा वापर केला जातो. अधिकतम घरांमध्ये पिवळी केळी नियमित खाल्ली जातात. पिवळ्या केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास, पचन सुधारण्यास आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
लाल केळी : भरपूर पोषणयुक्त

लाल केळी खाण्याचा फायदा
लाल केळ्याचा रंग भलेही वेगळा असेल, पण त्याचे फायदेही खास आहेत. लाल केळी हे अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. तज्ज्ञांच्या मते लाल केळी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. याशिवाय यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, जे ॲनिमियापासून बचाव करण्यास मदत करते असे अनेक अभ्यासांमध्ये सांगण्यात आले आहे
फक्त पिकलेली नाही तर कच्ची केळी खाण्याचे सुद्धा आहे अजब फायदे, एकदा पहाच
निळी केळी: दुर्मिळ आणि पौष्टिक

निळ्या केळ्यातील पोषण
निळी केळी किंवा निळी जावा केळी त्याच्या मलईदार पोत आणि व्हॅनिलासारख्या चवीसाठी ओळखले जाते. हा केळीचा एक दुर्मिळ प्रकार आहे आणि त्यात उच्च पातळीचे पोषण आहे. हा फायबर आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे आणि ही निळी केळी खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. निळे केळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे. मात्र ही केळी सहज उपलब्ध होत नाहीत.
या तिन्ही केळ्यांचे फायदे असून आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही खावीत. कारण यापैकी कोणत्याही केळ्याची एकमेकांशी तुलना करणे योग्य ठरणार नाही असेही डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






