• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Who Has Most Stroke Risk What Are The Preventive Measures Of Strokes

स्ट्रोक येण्याचा धोका सर्वात जास्त कोणाला? काय आहेत प्रतिबंधात्मक उपाययोजना

Stroke Risk: अनेकांना हल्ली स्ट्रोकचा धोका असलेला दिसतो. पण नक्की स्ट्रोकचा धोका का वाढतो आणि स्ट्रोकला कारणीभूत ठरणारे आजार अथवा त्यावरील उपाय नक्की काय आहे याची आपण माहिती देऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 10, 2024 | 06:54 PM
स्ट्रोकवर करा उपाययोजना

स्ट्रोकवर करा उपाययोजना

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संपूर्ण जगभरात स्ट्रोकमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा कायमचे अपंगत्व सहन करावे लागणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. स्ट्रोकचा धोका ज्यांना सर्वात जास्त आहे अशांसाठी, स्ट्रोकला कारणीभूत ठरणारे आजार किंवा आनुवंशिकता असणाऱ्या व्यक्तींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अजून जास्त महत्त्वाचे आहे. आजार लवकरात लवकर लक्षात येणे आणि त्यावर वेळीच योग्य ते उपचार केले जाणे महत्त्वाचे आहे. 

यामुळे स्ट्रोकच्या केसेसची संख्या कमी होऊ शकेल, रुग्णांना उपचारांमधून मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा होऊ शकेल.  स्ट्रोकचा धोका सर्वात जास्त असलेल्या व्यक्तींनी करावयाच्या महत्त्वाच्या उपायांची माहिती आपण या लेखामध्ये घेऊया. ज्यांची तीव्रता कमी करता येईल असे धोके, वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीतील पूरक बदल यांवर यामध्ये विशेष भर दिला आहे. डॉ. प्रदीप महिंद्रकर, चीफ ऑफ लॅब – पनवेल, अलिबाग आणि गोवा, मेट्रोपॉलिस हेल्थकेयर लिमिटेड यांनी ही अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)

स्ट्रोकचा सर्वात जास्त धोका या व्यक्तींना

  • हायपरटेन्शन: उच्च रक्तदाब हा स्ट्रोकला कारणीभूत असलेला सर्वात मोठा धोका आहे. रक्तदाब सतत वाढत राहिल्यास रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, त्यामुळे इशेमिक आणि हेमोरेजिक स्ट्रोक या दोन्हींचा धोका वाढतो
  • मधुमेह: मधुमेही व्यक्तींच्या शरीरात शर्करेचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो
  • हायपरलिपिडेमिया: कोलेस्टेरॉल वाढल्याने अथेरोस्क्लेरॉटिक प्लाक तयार होतो आणि इशेमिक स्ट्रोकचा धोका वाढतो
  • ऍट्रियल फिब्रिलेशन (एफिब): एफिबमुळे स्ट्रोकचा धोका पाच पटींनी वाढतो. हृदयाचे ठोके अनियमित असले तर हृदयात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, ज्या मेंदूपर्यंत जाऊ शकतात
  • धुम्रपान: धुम्रपानामुळे अथेरोस्क्लेरोसिस आणि थ्रॉम्बोसिस हे दोन्ही होतात. त्यामुळे स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो
  • स्थूलपणा आणि बैठी जीवनशैली: या दोन्हींमुळे हायपरटेन्शन, मधुमेह आणि हायपरलिपिडेमिया यांचा धोका वाढतो
  • जेनेटिक आणि कौटुंबिक इतिहास: कुटुंबात आधी, इतर कोणाला स्ट्रोक आला असेल किंवा कार्डिओवस्क्युलर आजार असतील तर पुढील पिढ्यांना देखील स्ट्रोकचा धोका वाढतो. खासकरून जर हायपरलिपिडेमिया किंवा एफिबसारख्या स्थितींची अनुवंशिकता असेल तर स्ट्रोकचा धोका जात असतो
  • किडनीचा जुनाट आजार (सीकेडी): सीकेडी असलेल्या व्यक्तींना स्ट्रोकचा धोका जास्त असतो कारण त्यांना हायपरटेन्शन, मधुमेह आणि वस्क्युलर नुकसान अशा सह्व्याधी असतात.  
ब्रेन स्ट्रोक हे जगातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण : डॉ.ललित महाजन

स्ट्रोकचा धोका सर्वात जास्त असलेल्या व्यक्तींसाठी प्रतिबंधात्मक उपाय 

हायपरटेन्शनवर नियंत्रण 

  • रक्तदाब नियंत्रणात ठेवा: सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्यांना धोका जास्त आहे अशा व्यक्तींनी सिस्टोलिक रक्तदाब १४० एमएमएचजीच्या खाली ठेवावे. ज्यांना किडनीचा जुना आजार किंवा मधुमेह आहे अशांचा रक्तदाब १३०/८० एमएमएचजीच्या खाली असला पाहिजे
  • औषधे: एसीई इनहिबिटर्स, एआरबी (अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स), कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स आणि डायरेटीक्स यांचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातो.

मधुमेह आणि हायपरलिपिडेमिया यांच्यावरील उपचार

  • ग्लायसेमिक नियंत्रण: रक्तातील शर्करेवर (ए१सी ७%च्या खाली) काटेकोर नियंत्रण ठेवल्यास मधुमेही रुग्णांमध्ये स्ट्रोकचा धोका कमी होतो
  • लिपिड कमी करण्याची थेरपी: हायपरलिपिडेमिया असलेल्या व्यक्तींसाठी स्टॅटिन्सचा सल्ला दिला जातो, खासकरून ज्यांना कार्डिओवस्क्युलर आजार आधीपासून आहेत त्यांना एलडीएल कोलेस्टेरॉल स्तर आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी हे आवश्यक असते.

अँटीथ्रोम्बोटिक थेरपी 

  • अँटीप्लेटलेट थेरपी: धोका जास्त असलेल्या व्यक्तींना, खासकरून ज्यांना आधी इशेमिक स्ट्रोक येऊन गेला आहे अशांना ऍस्पिरिनचा लहान डोस घेण्याचा सल्ला दिला जातो
  • एफिबमध्ये अँटीकोग्युलेशन: वॉरफेरीनसारखे अँटीकोग्युलेशन किंवा थेट तोंडावाटे घ्यावयाचे अँटीकोग्युलंट्स हे एफिबच्या रुग्णांमध्ये स्ट्रोकला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक असतात, खासकरून ज्यांना हायपरटेन्शन किंवा मधुमेहाचा अतिरिक्त धोका असतो त्या रुग्णांनी हे नक्की ध्यानात ठेवावे.

ऍट्रियल फिब्रिलेशनवरील उपचार 

रेट आणि रिदम नियंत्रण: एफिबवरील आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठीच्या औषधांमध्ये बीटा-ब्लॉकर्स, कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स आणि अँटी-अऱ्हिथमिक्स यांचा समावेश असतो. हृदयाचा सामान्य रिदम पुन्हा यावा यासाठी काही निवडक रुग्णांमध्ये अब्लेशन प्रक्रिया करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.  

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे तसेच त्यावरील उपाय; जाणून घ्या

स्ट्रोक येऊ नये यासाठी जीवनशैलीमध्ये करा हे बदल 

वैद्यकीय उपायांच्या बरोबरीने जीवनशैलीमध्ये अनुकूल बदल करून स्ट्रोकचा धोका कमी करता येतो. काही महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे आहेत

  • धुम्रपान करणे कायमचे सोडून द्या: असे केल्यास स्ट्रोकचा आणि इतर कार्डिओवस्क्युलर आजारांचा धोका खूप प्रमाणात कमी होतो. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आणि आचरणासंदर्भात मार्गदर्शन व सल्ला घेतल्यास धूम्रपान सोडून देण्यात मदत होते
  • वजनावर नियंत्रण ठेवा आणि शारीरिक कामे, व्यायाम करा: दर आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे तरी मध्यम ते उच्च तीव्रतेचे व्यायाम करून कार्डिओवस्क्युलर आरोग्य सुधारता येते आणि वजन कमी होण्यात देखील मदत होते. स्थूल व्यक्तींनी वजन कमी केल्यास रक्तदाब, ग्लुकोज मेटॅबोलिजम आणि कोलेस्टेरॉल स्तर यामध्ये सुधारणा होते आणि यांचा एकत्रित परिणाम म्हणून स्ट्रोकचा धोका कमी होतो
  • आहारातील बदल: डीएएसएच (हायपरटेन्शन बंद करण्यासाठी आहारातील बदल): या डाएटमध्ये सोडियमचे प्रमाण कमी करण्यावर, पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यावर, रोजच्या आहारात फळे, भाज्या, अखंड धान्ये आणि लीन प्रोटीन यांचा समावेश करण्यावर भर दिला जातो. यामुळे रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो असे आढळून आले आहे
  • मेडिटेरियन डाएट: यामध्ये आरोग्यदायी फॅट्स मुबलक असतात, अखंड धान्ये, मासे आणि भाज्या भरपूर असतात. या आहारामुळे स्ट्रोक व कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका कमी होतो
  • अल्कोहोलचे सेवन कमी करा: अल्कोहोलचे सेवन अति प्रमाणात केल्याने रक्तदाब, ऍट्रियल फिब्रिलेशन आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अल्कोहोलचे सेवन कमी करण्याचा (महिलांसाठी दररोज फक्त एक ड्रिंक आणि पुरुषांसाठी दोन) सल्ला दिला जातो

विशेष व्यक्तींसाठी विशेष धोरणे: 

  • ज्येष्ठ नागरिक: वयस्कर व्यक्तींसाठी रक्तदाब आणि अँटीकोग्युलेशन धोरणे तयार केली जावीत ज्यामुळे स्ट्रोकला प्रतिबंध घालता येईल, तसेच ब्लीडिंगचा धोका कमी होऊ शकतो
  • जुनाट किडनी आजार (सीकेडी) असलेले रुग्ण: व्यक्तिगत थेरपी: सीकेडी रुग्णांना हायपरटेन्शन आणि अँटीकोग्युलेशन यासाठी व्यक्तिगत उपचार द्यावे लागतात, कारण त्यांच्या बाबतीत ब्लीडिंगचा धोका जास्त असतो, तसेच किडनीबरोबरीनेच कार्डिओवस्क्युलर संरक्षण यांचे संतुलन साधणे गरजेचे असते

सार्वजनिक आरोग्य आणि धोरणे 

  • तपासणी आणि आजार लवकरात लवकर लक्षात येणे: ज्यांना स्ट्रोकचा धोका खूप जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये हायपरटेन्शन, मधुमेह आणि एफिब लवकरात लवकर लक्षात यावे यासाठी तयार करण्यात आलेले कार्यक्रम स्ट्रोक येण्याच्या आधी निवारक उपाय सुरु करण्यास मदत करू शकतात
  • देखभाल सेवासुविधांची उपलब्धता: आरोग्य शिक्षण: सार्वजनिक आरोग्य अभियानामध्ये स्ट्रोकबाबत माहिती पुरवली गेली पाहिजे तसेच ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगितले गेले पाहिजे. ज्यांना धोका खूप जास्त आहे अशा व्यक्तींना आरोग्य देखभाल सेवा सहज आणि परवडण्याजोग्या किमतींमध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे. यामध्ये औषधे, जीवनशैलीबाबत सल्ला यांचा समावेश होतो. आयुष्यात दीर्घकाळपर्यंत स्ट्रोक टाळण्यासाठी हे महत्त्वाचे आहे

ज्यांना स्ट्रोकचा धोका खूप जास्त आहे अशा व्यक्तींनी स्ट्रोकला प्रतिबंध घालण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन अवलंबिणे आवश्यक आहे. अति धोक्याच्या कक्षेत असणाऱ्या व्यक्ती ओळखणे, वैद्यकीय उपचार व उपाय करणे, जीवनशैलीमध्ये पूरक बदल घडवून आणण्यास प्रोत्साहन देणे यांचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे.

योग्य उपाय करून स्ट्रोकमुळे निर्माण होणारे ताणतणाव खूप कमी करता येऊ शकतात, जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करता येते, स्ट्रोक आल्यास अपंगत्व आणि उपचार यासाठी, आरोग्याच्या देखभालीसाठी करावे लागणारे खर्च कमी होतात. आजार लवकरात लवकर लक्षात येणे, व्यक्तिगत देखभाल आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रम यांची सांगड घालून आपण हे संकट नक्कीच दूर करू शकतो.

Web Title: Who has most stroke risk what are the preventive measures of strokes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 06:54 PM

Topics:  

  • Stroke

संबंधित बातम्या

मेंदूची नस फुटून येऊ शकतो स्ट्रोक, BP शूट करतात 3 कारणं; डॉक्टरांचे म्हणणे वाचाच!
1

मेंदूची नस फुटून येऊ शकतो स्ट्रोक, BP शूट करतात 3 कारणं; डॉक्टरांचे म्हणणे वाचाच!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.