रक्तवाहिन्या ब्लॉक का होतात? सकाळी फॉलो केलेल्या 'या' चुकीच्या सवयींमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच घाई असते. कोणाला शाळेत जायची घाई असते तर कोणाला कामानिमित्त बाहेर जाण्याची घाई असते. सकाळी उठायला उशीर झाल्यानंतर अनेक लोक सकाळचा नाश्ता न करता बाहेर पडून निघून जातात. पण असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. सकाळच्या याच छोट्या मोठ्या सवयींमुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. जगभरात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हार्ट अटॅक येण्याच्या ३ महिने आधी आणि हार्ट अटॅक येण्याच्या आठवडाभर आधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. पण शरीरात दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. दुर्लक्ष केल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
तेलकट आणि गोड खाल्ल्यावर प्या ‘हे’ पाणी, शरारीतून बाहेर काढून फेकेल साखर-तेल; नाही होणार गॅस
सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. रात्रभर कोणत्याही पदार्थांचे सेवन केले जात नाही. यामुळे मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावते आणि शरीराच्या कार्यात अडथळे येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्ता केल्यास मेटाबॉलिझम प्रक्रिया सुरळीत होऊन शरीराचे कार्य सुधारते. शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी साठवलेले ग्लुकोज आणि फॅट वापरले जातात, ज्यामुळे रक्तातील साखर अनियमित होते. यामुळे शरीरात शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाचे स्ट्रेस हार्मोन्स वाढते. हार्मोन्सचे प्रमाण वाढल्यानंतर रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते.
शरीरात वाढलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास सुरुवात होते. दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचा पिवळा थर जमा होऊ लागतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या प्लेकमुळे रक्त प्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे हृदयाच्या पावतात आणि हार्ट अटॅक सदृश स्थिती निर्माण होते. रक्त प्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येऊ शकतो.
बद्धकोष्ठतेत 4 पदार्थ रामबाण, न खाल्ल्यास मूळव्याध-फिस्टुलाची खात्री; ऑपरेशनही Fail, BDA चे उपाय
जास्त वेळ उपाशी पोटी राहिल्यास शरीरावर जास्तीचा तणाव वाढतो आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.सकाळी पोटभर नाश्ता न केल्यामुळे शरीराची इन्सुलिन सेंसिटिव्हिटी कमी होऊन जाते. यामुळे टाईप २ मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते.
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?
जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा अचानक कमी होतो किंवा थांबतो. हे सहसा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये (कोरोनरी धमन्या) चरबीचे थर जमा झाल्यामुळे होते. हा थर (प्लेक) तुटल्यास रक्ताची गुठळी तयार होते, जी रक्तप्रवाह पूर्णपणे थांबवते.
हृदयविकाराचा झटका येण्याची मुख्य कारणे कोणती?
कोरोनरी आर्टरी डिसीज हे हृदयविकाराचे सर्वात सामान्य कारण आहे. यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये चरबीचे थर (प्लेक) जमा होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो.
हृदयविकाराचा झटका आल्यास प्रथमोपचार कसा करावा?
उशीर करू नका. त्वरित आपत्कालीन सेवा (जसे की 108) किंवा जवळच्या रुग्णालयात फोन करा.रुग्णाला शांत राहण्यास सांगा आणि आरामदायक स्थितीत बसण्यास मदत करा. त्यांना सरळ बसवा, जेणेकरून श्वास घेणे सोपे होईल.