उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसणारी लक्षणे:
चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडते. त्यात प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल. सतत तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीराच्या नसांमध्ये पिवळा थर साचण्यास सुरुवात होते. हा थर शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये चिटकून राहतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात. त्यामुळे धावपळीचे जीवन जगताना सुद्धा खाण्यापिण्याच्या योग्य त्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅक का येतो आणि हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चरबीमुळे चेहरा फुग्यासारखा गुबगुबीत झालाय? मग या पदार्थांचे सेवन करा, रातोरात चरबी होईल कमी
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. सतत तेलकट, तिखट, जंक फूड खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. तसेच अनसेच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सयुक्त पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल वाढतो. यामध्ये तुम्ही सतत जर लाल मास किंवा प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खात असाल तर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. धूम्रपान, आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना इतर कोणतेही आजार लगेच होतात.
हे देखील वाचा: आतड्यांमधील वेदना कमी करण्यासाठी नियमित करा ‘हे’ गुणकारी उपाय, लगेच मिळेल आराम
शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आहारात फायबर युक्त अन्नपदार्थांचे सेवन करा. ज्यामुळे शरीराला फायदे होतील. रोजच्या आहारात शरीराला पचन होतील असे पौष्टिक अन्नपदार्थ खावेत. ज्यामध्ये विटामिन्स, मिनरल्स, प्रथिने इत्यादी घटकांचा समावेश असेल.कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी धूम्रपान करणे टाळावे. मानसिक तणाव कमी केल्यास शरीरातील आजार बरे होतील.