फर्टिलिटी दर का घसरत आहे, काय आहेत कारणे
2023 पासून दक्षिण कोरियामध्ये प्रजनन दर सातत्याने कमी होत आहे. आकडेवारीनुसार, येथील प्रजनन दर प्रति महिला 0.72 मुलांवर पोहोचला आहे. ही घसरण एक गंभीर संकट आहे. इतकंच नाही तर सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही प्रजनन दरात घट होत आहे. भारतातील प्रजनन दरातील घट दक्षिण कोरियाच्या तुलनेत कमी असली तरी देशासाठीही ती चिंतेची बाब बनत आहे. अभ्यासानुसार यामध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, द्रमुक नेते स्टॅलिन आणि चंद्राबाबू नायडू हे सातत्याने लोकांना 3 पेक्षा जास्त मुले जन्माला घालण्याची विनंती करत आहेत. पण आताची परिस्थिती पाहता ही देशाची सर्वात मोठी गरज बनणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार 2050 पर्यंत देशातील वृद्धांची संख्या तरुणांपेक्षा जास्त असेल. अशा परिस्थितीत प्रश्न नक्कीच पडतो की लोक कोणत्या कारणांमुळे कुटुंब वाढवण्यालाला प्राधान्य देत नाहीत? आम्ही तुम्हाला इथे 5 मुद्दे समजावून सांगत आहोत (फोटो सौजन्य – iStock)
वाढती महागाई
वाढती महागाई, सध्याच्या जीवनशैलीवरील खर्च आणि नोकरीची अनिश्चितता यामुळे मुलांचे संगोपन कुटुंबासाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत आज लोकांना एकापेक्षा जास्त अपत्ये जन्माला घालण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे महागाईची झळ ही मुलांना जन्म घातल्यानंतरही परवडणारी नाही आणि म्हणून केवळ एकच मूल हवं असे दृष्य सध्या अनेक कुटुंबात असल्याचे दिसून येत आहे.
महिलांची बदलती प्राथमिकता
महिलांचे बदलते प्राधान्य
प्राचीन काळी स्त्रियांची महत्त्वाची भूमिका आणि काम हे केवळ कुटुंब सांभाळणे आणि घरातील गोष्टी पेलणे एवढीच मर्यादित होती. पण बदलत्या काळानुसार महिलांना स्वतःला फक्त आई म्हणून नाही तर आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्यक्ती म्हणून बघायचे आहे. अशा स्थितीत स्त्रिया नोकरीत रुजू होत असताना, शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती करत असल्याने लग्न आणि मुले जन्माला घालण्यासाठी तयार नाहीत आणि त्यांना करिअर अधिक महत्त्वाचे वाटत आहे
पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा
DINK ट्रेंड
Double Income No Kids अशी संकल्पना सध्या रुजू झाली आहे. सध्या मुलगा वा मुलगी हे लग्नाला उशीर करू लागले आहेत. त्यामुळे कुटुंब विस्तारण्यासाठीही विलंब होत आहे. तसेच, लहान कुटुंबांच्या वाढत्या ट्रेंडमुळे, लोक अधिक मुले होण्याचा विचार टाळतात. तर काही जोडपी ही मुलं जन्माला न घालण्याचा निर्णय लग्नाच्या आधीच घेतात आणि त्यामुळे फर्टिलिटी रेट दिवसेनदिवस वाढत चालला आहे.
वंध्यत्व
वंध्यत्वाची वाढती समस्या
जीवनशैली, तणाव आणि पर्यावरणीय घटकांमुळे वंध्यत्वाची वाढती प्रकरणेदेखील देशाच्या कमी प्रजनन दरास कारणीभूत आहेत. याशिवाय, वंध्यत्व उपचार आणि त्याचे पर्यायदेखील महाग आहेत, जे सामान्य उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी कठीण आहे. हल्ली महिलांमध्येच नाही तर अगदी पुरुषांमध्येही वंध्यत्वाची समस्या वाढत चालली आहे.
भारतासाठी चिंतेची बाब
ही परिस्थिती भारतासाठी गंभीर चिंतेची बाब आहे, कारण देशाच्या आर्थिक विकासात तरुणांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत ही घसरण कायम राहिल्यास भारताच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अभ्यासात सांगितल्याप्रमाणे 2050 मध्ये तरूणांपेक्षा म्हाताऱ्यांची संख्या ही अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
100 च्या वेगाने फर्टिलिटी वाढवतील 5 पदार्थ, पुरूषांसाठी ठरतील वरदान