जागतिक दयाळू दिवस
13 नोव्हेंबर रोजी जगभरात सगळीकडे जागतिक दयाळू दिवस साजरा केला जातो. माणसाच्या मनात असलेला दयाळूपणा निरोगी जीवन जगण्यासाठी फार महत्वाचा आहे. पण दयाळूपणा नसेल तर जीवन जगणे अनेकदा कठीण होऊन जाते. त्यामुळे नेहमी हासत खेळत आयुष्य जगले पाहिजे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मन शांत असणे आवश्यक आहे. मनामध्ये असंख्य विचार, सतत राग, एखाद्या व्यक्तीबद्दल सतत वाईट विचार करणे इत्यादी गोष्टींमुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शांत मन ठेवण्यासाठी आनंद असणे आवश्यक आहे. एखाद्याची मदत करणे, दान करणे, लोकांची सेवा करणे इत्यादी गोष्टी करत दयाळूपणा व्यक्त केल्यास जीवन अधिक सुखकर होईल. जगभरात मोठ्या आनंद आणि उत्साहाचे दयाळू दिवस साजरा केला जातो.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: World Pneumonia Day: ‘या’ लोकांना असतो न्यूमोनियाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे
कोणत्याच व्यक्तीबद्दल मनात द्वेष निर्माण न ठेवता जगल्यास जीवन जगण्यास आणखीन आनंद आणि मजा येईल. प्रेमळ भावना व्यक्त करत इतरांशी दयाळू भावनेने वागणे, हा निरोगी जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे नेहमी हसत खेळत आयुष्य जगावे. पण मनामध्ये सोशल एन्क्झायटी निर्माण झाल्यानंतर मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. मानसिक आरोग्याचा पूर्ण संबंध शारीरिक आरोग्याशी जोडलेला असतो. त्यामुळे मन शांत ठेवून प्रेमळ भावना व्यक्त करत सगळ्यांशी चांगले बोलवावे.
सोशल एन्क्झायटी निर्माण झाल्यानंतर मानसिक आरोग्यासोबतच निरोगी जीवन जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते.पण दयाळू भावना व्यक्त केल्यास सोशल एन्क्झायटीपासून सुटका मिळवण्यास मदत होईल. अनेक अभ्यासांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, दयाळू भावना व्यक्त केल्यामुळे मन शांत राहते आणि तणाव, अस्वस्थतात कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे.जगभरातील करुणा, सहानुभूती आणि सद्भावना यांना प्रेरणा देणाऱ्या अनेक कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दयाळू दिवस साजरा केला जातो.
दयाळू भावनेचा शारीरिक आणि मानसिक आजारांशी थेट संबंध आहे. शरीराला आलेली सूज, मधुमेह, कर्करोग, क्रोनिक पेन, लठ्ठपणा, मायग्रेन इत्यादीउ आजारांमुळे शरीराला सूज येण्याची शक्यता असते. पण ऑक्सिटॉसिन हार्मोन्स शरीरावर आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतो. दयाळूपणा आणि शांत मानसिक आरोग्य ऑक्सिटॉसिन हार्मोन्स निर्माण करण्यास मदत करतात.
हे देखील वाचा: World Pneumonia Day: न्यूमोनिया संबंधित गैरसमजूती करा दूर, करू नका दुर्लक्ष






