फोर्टिसकडून कॅन्सर सर्व्हायवर्स आणि रूग्णांसाठी टॅलेंट अँड पेंटिंग सत्राचे आयोजन
मुंबई : जागतिक कर्करोग दिन 2025 साजरा करण्यासाठी फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने टॅलेंट अँड पेंटिंग सत्राचे आयोजन केले, ज्यामध्ये कर्करोगाने पीडित रूग्ण व सर्व्हायवर्सच्या अविश्वसनीय प्रतिभा पाहायला मिळाल्या. या उपक्रमामध्ये 150 व्यक्तींचा सहभाग दिसण्यात आला आणि त्यांनी एकत्र येत अनुभवांची देवाणघेवाण केली, तसेच कर्करोगाने पीडितांप्रती एकजूटता व्यक्त केली. यामुळे जागतिक थीम ‘युनायटेड बाय युनिक’शी बांधील राहत कर्करोग केअरबाबत अर्थपूर्ण संवादांना चालना देण्याच्या माध्यमातून आशा व सामुदायिक भावनेला चालना मिळाली. तसेच कर्करोगावरील उपचार प्रवासादरम्यान मानसिक व भावनिक आरोग्य उत्तम ठेवण्याचे महत्त्व देखील निदर्शनास आले.
सोनू निगमला होतोय पाठदुखीचा त्रास! स्नायूंमध्ये क्रॅम्प आल्यास नक्की करा ‘हे’ घरगुती उपाय
या उपक्रमाने सहभागींना सर्जनशीलपणे संलग्न होण्यासाठी महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म दिला, तसेच कर्करोगाशी संबंधित प्रमुख समस्यांबाबत जागरूकतेचा प्रसार केला. आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून व्यक्तींनी वैयक्तिक गाथा शेअर केल्या, कर्करोगग्रस्त सह-रूग्णांना पाठिंबा दिला आणि कर्करोगावर मात करण्यासाठी लवकर निदान, प्रतिबंध व उपचाराच्या महत्त्वावर भर दिला. पाठिंबा व एकजूटता दाखवण्यासाठी फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्टर्स देखील इव्हेण्टप्रसंगी उपस्थित होते आणि त्यांनी कर्करोगाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यामध्ये सहाय्यक समूह बजावणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत भाषण सादर केले.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. विशाल बेरी म्हणाले, ”आम्हाला हा इव्हेण्ट आयोजित करण्याचा अत्यंत अभिमान वाटतो, जो कलाकृती व सर्जनशीलतेचे साजरीकरण असण्यासोबत त्यामधून कर्करोगाचा सामना केलेल्या आणि पॅशन व चिकाटीसह विषमतांवर मात केलेल्या कर्करोगाने पीडित व्यक्तींचे साहस, धैर्य आणि चिकाटी दिसून येते. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे अग्रणी म्हणून आम्ही जागरूकतेचा प्रसार करण्याचा, सामुदायिक भावनेला चालना देण्याचा आणि या उपक्रमाच्या माध्यमातून लवकर निदान व उपचाराच्या महत्त्वावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. सहयोगाने, आम्ही आजाराचा सामना करण्यासोबत समुदायामध्ये पाठबळ, करुणा व प्रगतीची भावना जागृत करत आहोत.”
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ आंबट गोड फळाचे सेवन,आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
श्री. मंधारे (कॅन्सर वॉरियर) म्हणाले, ”आज येथे उपस्थित राहून अनेक अविश्वसनीय व्यक्तींसोबत परफॉर्म करताना मला आम्ही सर्वांनी इथवर आलेल्या प्रवासाची आठवण झाली. कर्करोगाने आमच्यावर मोठा परिणाम करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ते यशस्वी होऊ दिले नाही. आम्ही आज आमच्या गाथा, आमचा आनंद, हास्य व आशा शेअर करण्यासाठी समुदाय म्हणून एकत्र आलो. कर्करोगामुळे वेगळेपणाची भावना निर्माण होऊ शकते, पण यासारखे इव्हेण्ट्स मला आठवण करून देतात की आम्ही या लढ्यामध्ये कधीच एकटे नाही आहोत. आमच्यामध्ये दृढ नाते निर्माण झाले आहे, जे आमच्या कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासापलीकडे देखील राहिल.”