फोटो सौजन्य - Social Media
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) मधील नावाजलेले सुपरस्टार बटिस्टा त्यांच्या वेट लॉस मुले प्रसिद्ध झाले आहेत. भारतामध्ये अनेक जण बटिस्टाचे चाहते आहेत. बटिस्टा अनेकदा हॉलिवूडच्या सिनेमांमध्येही झळकला आहे. WWE रेसलरसोबत बटिस्टा एक चांगला अभिनेता आहे. अनेक पिंग्रजी चित्रपटांमध्ये त्याने आपली भूमिका निभावली आहे. यामुळे तो जगभर गाजला आहे. महत्वाचे म्हणजे त्याला सगळ्यात मोठी प्रसिद्धी WWE मध्ये मिळाली होती. WWE मध्ये बटिस्टा हे खूप जुने आणि गाजलेले नाव आहे.
हे देखील वाचा : हृदयाच्या झडपांच्या आजाराची लक्षणे, कारणे, प्रतिबंध
बटिस्टाने त्याचे वजन कमी केल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. या चर्चेमध्ये अनेक जणांनी त्याची वेट लॉस स्टोरी जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली आहे. जगात अनेक लोकं वाढत्या वजनाने त्रासले आहेत तर बहुतेक जण लठ्ठपणाच्या त्रासाशी झुंज देत आहेत. अशामध्ये बटिस्टाच्या या बातमीने उधाण आले आहे. वाढत्या वजनाच्या समस्येने त्रासलेल्या लोकांमध्ये बटिस्टाची वेट लॉस करण्याची गोष्ट ऐकण्याची इच्छा वेटाकुटिला पोहचली आहे.
५५ वर्षीय WWE रेसलर बटिस्टाचे वजन अगोदर १३० किलोग्रॅम होते, जे आता १०८ किलोग्रॅम झाले आहे. एकंदरीत, बटिस्टाने २२.७ किलो वजन कमी केलं आहे. बटिस्टाने मार्वल सिनेविश्वाच्या बॅनर खाली तयार झालेल्या गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी या चित्रपटामध्ये काम केले होते. या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बटिस्टाचा नवीन लुक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते. त्याचा अचानक वजन कमी झालेला अवतार पाहताच लोकांना प्रश्न पडला होता. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि नॉक ॲट द केबिन या सिनेमासाठी त्याला १३० किलो वजन वाढवावे लागले होते.
बटिस्टा म्हणतो कि त्याने हे वजन कमी करण्यासाठी फार कष्ट घेतले होते. सोबत मार्शल आर्ट्सची ट्रेनिंगही घेतली होती. विशेष म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूट दरम्यान त्याचा ट्रेनर जेसन मैनलीला सोबत ठेवले होते.
वजन कमी करण्यासाठी काय करावे?
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही खानपानावर विशेष लक्ष दिले पाहिजे. असे काही लोक आहेत जे वजन कमी करण्यासाठी खाणे बंद करतात. प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगळा असावा. अचानक काही खाल्ले नाही तर तुमचे वजन कमी होईल पण शरीराला अनेक प्रकारे नुकसान नक्कीच होते. जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तेव्हा तुम्ही योग्य आहाराचे पालन करा हे महत्त्वाचे आहे.