पोटावरील चरबी कमी करण्यासाठी योगासने
वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त झाले आहेत. शरीरात वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. लठ्ठपणा वाढू लागल्यानंतर शरीराच्या अनेक अवयवांवर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. शरीरात वाढलेली चरबी योग्य वेळी कमी केली नाहीतर कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, बीपी इत्यादी गंभीर आजार वाढू लागतात. शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक महिला गोळ्या किंवा प्रोटीन पावडर घेतात. पण असे केल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो, पण इतर आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे गोळ्या औषध घेऊन वाढलेले वजन कमी करण्यापेक्षा योगासने करून वाढलेले वजन कमी करावे. शारीरिक, मानसिक आणि इतर गंभीर आजार दूर करण्यासाठी योगासने मदत करतात.
शरीरात लठ्ठपणा फारकाळ तसाच राहिल्यामुळे शरीरात चरबीच्या गाठी तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आहारात बदल करून योग्य ती जीवनशैली जगणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: व्याघ्रासनामुळे शरीराला मिळतात हे 5 फायदे
पश्चिमोत्तानासन आसन करण्यासाठी अतिशय सोपे आहे. हे आसन केल्यामुळे पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना सगळ्यात आधी जमिनीवर बसा. त्यानंतर पोटातून बेंड व्हा. नंतर तुमचे पाय डोक्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय दोन्ही हातांनी पकडून ठेवा. 5 ते 10 सेकंड या स्थितीमध्ये राहिल्यानंतर सामान्य स्थितीमध्ये येऊन बसा.
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी धनुरासन करावे. धनुरासन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.काहींना धनुरासन करायला कठीण वाटते, पण हे आसन केल्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींचे ऑपरेशन किंवा पोटाला टाके असतील अशांनी धनुरासन करू नये.धनुरासन करताना सगळ्यात आधी जमिनीवर उलटे झोपा. त्यानंतर दोन्ही पाय हाताने मागच्या बाजूने वर उचला. हे करताना तुमचे पोट जमिनीला टेकलेले असेल, याची खात्री बाळगा. अशा पद्धतीने धनुरासन केल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी होईल.
हे देखील वाचा: उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची ‘ही’ आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ
पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन अतिशय फायदेशीर आहे. हे आसन करताना जमिनीवर उलटे झोपा. त्यानंतर दोन्ही हात जमिनीवर टेकवून घ्या. हात जमिनीवर ठेवून मानेपासून वरचा भाग कंबरेपर्यंत वर खेचा. हे आसन करताना शरीर उलट्या दिशेने फिरल्यामुळे पोटावरील चरबी कमी होईल.