उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ (फोटो सौजन्य:सोशल मीडिया)
जीवनशैली आणि वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे अनेक जण शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. पचनासंबंधीत होणारे आजार, पित्ताचा त्रास आणि मानसिक थकवा जाणवणं या समस्या कमी वयातच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. जसा मानसिक आरोग्याचा थेट परिणाम हा शरीरावर दिसून येतो तसंच शरीरातील होणाऱ्या बदलाचा चांगला वाईट परिणाम देखील तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. जसं योग्य आहार शरिरासाठी महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे नाश्ता आणि जेवणाची योग्य वेळ पाळणं देखील महत्त्वाचं आहे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
आपली भारतीय संस्कृती ही ऋतूचक्रावर आधारित आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित काय काळजी घ्यावी याबाबत आयुर्वेदात सांगितलं आहे. योग्य आहाराप्रमाणेच सकाळचा नाश्ता दुपारचं आणि रात्रीच्या जेवणाची वेळ पाळणं देखील महत्त्वाचं आहे. आहारतज्ज्ञ सांगतात की, ऑफिसच्या कामामुळे अनेक जणांचा जेवणाची वेळ पाळणं शक्य होत नाही. याचा होणारा परिणाम म्हणजे कमी वयात जडणाऱ्या शारीरिक व्याधी. पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती नसल्याने शरीर वातावरणात होणारे बदल सहजपणे स्वीकारु शकत नाही.
हेही वाचा- स्वयंपाकघरातील हे मसाले कमी नाहीत औषधापेक्षा, जाणून घ्या फायदे
उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची ‘ही’ आहे योग्य वेळ
सकाळचा नाश्ता
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी सकाळी सात ते आठ यावेळेत नाश्ता करणं महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणानंतर ते सकाळी उठेपर्यंत किमान 10 ते 12 तासांचं अंतर असतं. त्यामुळे पोटात अग्नी तयार होतो. योग्य वेळेत नाश्ता न केल्याने पित्त वाढतं आणि याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. म्हणूनच सकाळी लवकर उठल्यावर आधी कोमट पाणी प्या. त्यानंतर सात ते आठ यावेळेत सात्विक असा पोटभर नाश्ता करा. अनेकांना सकळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र याचं सेवन आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे चहा आणि कॉफी ऐवजी तुम्ही सकळी ग्रीन टी घेऊ शकता.
हेही वाचा- पोटातील जंतांच्या त्रासाने त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, पोट होईल स्वच्छ
दुपारचे जेवण
सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यात किमान चार तासांचं अंतर असणं महत्त्वाचं आहे. दुपारचं जेवण हे 12 ते 12.30 या दरम्यान करणं महत्त्वाचं आहे. तसंच दुपारच्या जेवणात तुम्ही काकडी, गाजर,बीट आणि कडधान्य यांची कोशिंबाीर खा. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. बरेच जण हे दुपारी 3 ते 4 या वेळेत जेवण करतात. मात्र या सवयीमुळे शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो. दुपारच्या 12.30 पर्यंत जेवण झाल्यानंतर मधल्या वेळेत तुम्ही फळं खाऊ शकता.
रात्रीचं जेवण
बरेच जण रात्री 10 ते 12 या वेळेत जेवण करतात. मात्र या सवयीमुळे शरीरावर याचा हळूहळू वाईट परिणाम होतो. आयुर्वेदानुसार सुर्यास्त होण्याआधी रात्रीचं जेवण करणं आरोग्यदायी असल्याचं सांगितलं जातं. चांगल्या आरोग्यासाठी रात्री जेवण हे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत करा. जर हे शक्य होत नसेल तर किमान रात्री झोपण्याच्या तीन तास आधी जेवण करावं. त्यामुळे पचनसंस्था सुधारते असं आहारतज्ज्ञ सांगतात.