(फोटो सौजन्य: istock)
फ्लाइट आणि ट्रेनचा पर्यायी वापर करा
फ्लाइट आणि ट्रेन यांचा आळीपाळीने वापर करणं हा खर्च वाचवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही एकाच टूरमध्ये जर अनेक शहरं किंवा देश पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर एका ठिकाणी फ्लाइटने पोहोचा आणि पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनचा आधार घ्या. उदाहरणार्थ, युरोप फिरताना तुम्ही आपल्या देशातून लंडनला फ्लाइटने जाऊ शकता. तिथे पाहण्यासारखी ठिकाणं पाहून झाल्यावर केवळ दीड-दोन तासांच्या ट्रेन प्रवासाने सहज पॅरिसला पोहोचता येतं. हा मार्ग आरामदायी, जलद आणि बजेट-फ्रेंडली आहे.
शेंगेन देशांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त वापर
शेंगेन झोनमध्ये बस, ट्रेन, ट्राम किंवा मेट्रोसारखं पब्लिक ट्रान्सपोर्ट खूपच विकसित आणि स्वस्त आहे. त्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात जाणं अधिक सोपं, शिस्तबद्ध आणि खिशाला हलकं पडतं.
बॉर्डरजवळ रेंटल कारचा पर्याय
EU ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट असेल तर युरोपमध्ये कार चालवणं अगदी सोपं असतं. एका देशातून दुसऱ्या देशात कारने जाण्यासाठी विशेष अडथळे नसतात. उदाहरणार्थ, स्लोव्हेनियातून इटली फक्त दीड तासांच्या ड्राइव्हवर आहे. या प्रवासात डोंगररांगा, वाइनयार्ड्स आणि दोन्ही देशांची वेगळी संस्कृती अनुभवता येते. समूह प्रवास किंवा कुटुंबासोबत असताना रेंटल कारचा खर्च खूपच कमी पडतो.
एका ट्रिपमध्ये दोन देशांचे नियोजन करताना काय लक्षात ठेवावे?






