अहमदनगर : तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे. दोन वर्षाच्या कोविडच्या संकटानंतर भाविकांसोबत रामनवमी उत्सव साजरा होत असून देश-विदेशातील साईभक्त साईबाबांच्या शिर्डीत दाखल होत आहे.
१११ वा रामनवमी उत्सव शिर्डीत साजरा होत आहे. साईभक्तांच्या दर्शनासाठी आज रात्रभर मंदिर खुले राहणार आहे.
रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल झाले आहेत. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यावर्षी मोठा उत्साह साईभक्तांमध्ये दिसून येतोय. रामनवमी उत्सव शिर्डीत तीन दिवस साजरा केला जातो. आज उत्सवाचा मुख्य दुसरा दिवस असून दिवसभर विविध कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. या वर्षी पालख्या घेऊन येण्यास परवानगी असल्याने राज्यभरातून साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत आज रामनवमीचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. आज सर्व साईभक्तांना दर्शन घेता याव यासाठी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी ४ वाजता निशाण मिरवणूक तर सायंकाळी ५ वाजता रथ मिरवणूक ही काढण्यात येणार आहे.
[read_also content=”रणबीर- आलियाच्या लग्नासाठी दिल्ली-लखनऊवरून येणार खास स्वयंपाकी; असणार २५ व्हेज काऊंटर्स, असा रंगणार संपूर्ण सोहळा https://www.navarashtra.com/movies/alia-bhatt-ranbir-kapoor-wedding-details-special-chefs-are-invited-from-delhi-and-lukhnow-nrak-266577.html”]