 
        
        धुळे विभागात दीपोत्सवाच्या १० दिवसांचा काळ एसटी महामंडळासाठी कोट्यवधींची कमाई केली (फोटो - सोशल मीडिया)
ST Bus: धुळे: दिवाळीच्या निमित्ताने स्वतःच्या गावी जाणारे अनेक लोक असतात. पर्यटक, विद्यार्थी आणि स्थलांतरित मोठ्या प्रमाणामध्ये लालपरीची वापर करतात. त्यामुळे दिवाळी ही एसटी महामंडळाला लक्ष्मी देणारी ठरते. यंदाच्या दीपोत्सव काळात नंदुरबार जिल्ह्यातील एसटीच्या चौघा आगारांना अक्षरशः सोन्याची पर्वणी लाभली आहे. दीपोत्सवाच्या १० दिवसांत तब्बल ४ कोटी ३० लाख ७९ हजारांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी दीपोत्सवात तीन कोटी ८७ हजारांची कमाई केली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ४३ लाखाहून अधिकची कमाई केल्याने दीपोत्सवाच्या १० दिवसांचा काळ एसटी महामंडळासाठी बंपर कमाईचा काळ ठरला आहे.
दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आपल्या गावी तसेच भेटीगाठी करण्यासाठी प्रवास केला. जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, नवापूर व अक्कलकुवा या चारही आगारांच्या बस फेऱ्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. सात लाख ४६ हजार ९६ प्रवाशांनी गेल्या दहा दिवसात प्रवास केला. यामुळे कधी नव्हे तो प्रवासी वाहतूकीचा विक्रम यंदा एसटीने केला आहे. दरम्यान, वाढत्या गर्दीचा विचार करुन एसटी प्रशासनाने अतिरिक्त बस फेऱ्या चालविल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना सुलभ सेवा मिळाली. तर महसूलातही वाढ झाली. वाढत्या प्रवासी संख्येमुळे आगार कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून गेल्या वर्षाभरातील सर्वाधिक उत्पन्नाचा कालावधी ठरला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या आगारांनीही लावलाय मोठा आर्थिक हातभार
जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा व नवापूर या चौधा आगारांमधून चंदा एकूण १६ हजार ६११ बसफेऱ्या १० दिवसात झाल्या. यातून तब्बल ७ लाख ४६ हजार ९६ इतक्या प्रवाशांनी प्रवास केला तर गेल्यावर्षी दीपोत्सवात १० दिवसांच्या कालावधीत १२ हजार ६८९ फेऱ्या झाल्या होत्या. यातून ७ लाख ३६ हजार ८३६ प्रवाशानी प्रवास कैला, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ९ हजार २६०प्रवाशांनी अधिक प्रवास केला आहे. यंदा १६ ते २६ ऑक्टोबर या दीपोत्सवाच्या कालावधीत एसटीने ४ कोटी ३० लाख ७९ हजारांची कमाई केली आहे. गेल्यावर्षी २७ ऑक्टोबर त ६ नोव्हेंबर या १० दिवसाच्या कालावधीत ३ कोटी ८७ लाख ७१ हजारांची कमाई केली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ४३ लाख ८ हजारांची कमाई अधिक केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विभागीय नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे म्हणाले की,”दीपोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेता वाढीव बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार प्रवाशांना सोयी, सुविधा पुरविण्याचे नियोजन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले होते. यातुन नंदुरबार व धुळे जिल्हा मिळून सर्व ९ आगारांमधून गेल्या वर्षाच्या तुलनेत ५७ लाख ९४ हजारांची अधिक कमाई झाली आहे. यापुढेदेखील प्रवाशाना दर्जेदार सेवादेण्यासाठी कटीबध्द आहोत, असा भावना विभागीय नियंत्रण व्यवहारे यांनी व्यक्त केल्या.






