पुणे: बदललेल्या जीवनशैलीनुसार निर्माण झालेली मोठ्या घरांची मागणी, गरजेनुसार सोयीचे ठरेल अशा परिसरातच सदनिकेची खरेदी, तसेच कोरोनानंतर घर कसे असावे, याबाबत वाढलेल्या अपेक्षा यामुळे शहरात महागड्या सदनिकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१९च्या तुलनेत २०२३च्या पहिल्याच सहामाहीत एक कोटीपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची विक्री २५० टक्क्यांनी वाढली आहे.
जानेवारी ते जून २०२३ दरम्यान पुण्यात एक कोटी किंमत (करारातील रकमेनुसार) असलेल्या पाच हजार ४११ फ्लॅटची विक्री झाली आहे. या फ्लॅटचे एकूण मूल्य आठ हजार १६२ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात चार हजार घरांची विक्री झाली होती. त्यातून सहा हजार ३२१ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे ‘क्रेडार्इ पुणे मेट्रो’ने तयार केलेल्या अहवालात नमूद आहे.
-एक कोटीपेक्षा जास्त किमतीच्या घरांची झालेली विक्री
कालावधी – विकलेल्या घरांचे एकूण मूल्य (कोटीत) – विक्री झालेल्या घरांची संख्या
२०१९ (जानेवारी ते जून) – २,३३० – १,४५८
२०१९ (जुलै ते डिसेंबर) – २,५१३ – १,५५०
२०२० (जानेवारी ते जून) – १,२८७ – ८३७
२०२० (जुलै ते डिसेंबर) – ४,०६२ – २,५२३
२०२१ (जानेवारी ते जून) – ३,७०१ – २,२१७
२०२१ (जुलै ते डिसेंबर)- ३,७९० – २,२८२
२०२२ (जानेवारी ते जून) – ६,३२१ – ४,००१
२०२२ (जुलै ते डिसेंबर) – ६,००३ – ३,७५५
२०२३ (जानेवारी ते जून) – ८,१६२ – ५,४११
-घरांच्या किमतीनुसार विक्री झालेल्या व्यवहाराचे मूल्य (कोटीत)
वर्ष – ४५ लाखांच्या खालील – ४५ ते ७० लाख – ७० लाख ते १ कोटी – १ ते २ कोटी – २ कोटींपेक्षा जास्त
२०१९ – १०,४६५- १०,०९८ – ३,८५३ – ३,२४० – १,६०३
२०२० – ९,८४० – ९६०७ – ४,३६४ – ३,५५२ – १,७९७
२०२१ – ११,१६३ – ११,८०२ – ५,६०५ – ४७४५- २७४७
२०२२- ११,८४३ – १३,८६६ – १०,२७२ – ८४०४ – ३,९१९
२०२३ – ६५२८ – ७०३८ – ६६७९ – ५९४३ – २२१९
[blockquote content=”कोरोनाकाळात प्रत्येकाला मोठ्या घराचे महत्त्व समजले. त्यामुळे आता घर घेताना त्यांची किंमत आणि घर किती मोठे आहे यावर जास्त लक्ष दिला जात आहे, तसेच घर खरेदीदारांमध्ये तरुणार्इचा समावेश सर्वाधिक आहे. आपल्या जीवनशैलीला साजेसे घर घेण्याला त्यांचे प्राधान्य आहे. जुनी व छोटी असलेली सदनिका विकून मोठे घर घेणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यामुळे सध्या महागड्या आणि मोठी घरांची मागणी आहे. गेल्या दीड वर्षात ही मागणी झपाट्याने वाढल्याचे दिसते. ” pic=”” name=”- सूर्यकांत काकडे, बांधकाम व्यावसायिक”]






