कल्याण : खड्डे भरण्याच्या कामात ४० टक्के लाच घेतली जाते..ठाण्याचे आयुक्त चांगलं काम करतायत.. मात्र इथल्या अधिकाऱ्यानी कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर सुरु असल्याची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.
कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेलाय..खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याचा दावा महापालिकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी ही शरमेची बाब आहे दरवर्षी खड्डे भरण्यासाठी टेंडर काढले जातात.४० टक्के रस्त्याच्या कामात लाच घेतली जाते त्यामुळे ठेकेदारावर नियंत्रण नाही..कामात दर्जा नाही.कोणतेही अद्यावत यंत्रणा पालिकेकडे नाही.इच्छा शक्तीचा भाग आहे.. ठाण्याचे आयुक्त चांगले आहेत,नवी मुंबईत देखील त्यांनी चांगलं काम केलं कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडून दिले आहे.. महापालिका ऑटो मोड वर चालली आहे… कुणाचा कुणाला मागमूस नाही अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.
अयोग्य नियोजनामुळे मानकोली रखडले एन निवडणुकीच्या तोंडावर पूल सुरू होणार ,मात्र डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला वाहतूक कोंडीच्या मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाव माणकोली पूल खुला करतील मात्र पुलाला एक्सेस रस्ते तयार नसल्याने डोंबिवलीकराना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केला. मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली मानकोली पुलाची माणकोली बाजूने पाहणी केली.यावेळी त्यांनी माणकोली पूल तयार झाला तरी पुलाला येण्या जाण्याचे डोंबिबली मोठागाव तसेच माणकोलीचे रस्ते अजून तयार नाही… यांचे नियोजन नाही.. हे रस्ते आधीच तयार करणे गरजेचे होते. निवडणुका च्या तोंडापर्यंत हे काम खेचायचे असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.