महाराष्ट्रात बदल्यांच सत्र सुरूच, पुन्हा ६ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून पोलिस प्रशासनामध्ये मोठे बदल पहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसात सरकारने राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरू ठेवलं आहे. आता राज्यातील ६ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Maharashtra Government: ‘आयटीआय जागतिक दर्जाच्या केंद्रात….’; राज्य शासनाने नेमकी कशाला दिली मंजूरी?
मुंबई लोहमार्ग विभागाचे आयुक्त रवींद्र शिसवे यांची गुप्त वार्ता विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमरावतीचे पोलिस आयुक्त एन डी रेड्डी यांची देखील बदली करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी, शारदा वसंद निकम, निसार तांबोळी, सुप्रिया पाटील यादव, राजीव जैन आणि अभिषेक त्रिमुखे यांची देखील बदली करण्यात आली आहे.
अमरावतीचे पोलिस आयुक्त एन डी रेड्डी यांची नागपूरमध्ये सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निकम शारदा वसंत यांची अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी तर सुप्रिया पाटील यादव यांची विशेष पोलिस महानिरीक्षकपदी (आस्थापना) नियुक्ती करण्यात आली आहे.
निसार तांबोळी यांची राज्य राखीव पोलिस बल नागपूर येथे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव जैन यांची सागरी विभाग विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आणि अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून बदली करण्यात आली आहे.