छगन भुजबळ यांनी आरक्षणासाठी ओबीसी समाजाच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठक बोलावली (फोटो - सोशल मीडिया)
नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये नाराजीचा पूर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे मित्रपक्षातील अनेक नेते नाराज आहेत. अजित पवार गटातील नेते आमदार छगन भुजबळ यांनी कामाला सुरुवात केली आहे. येवल्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसह छगन भुजबळ हे ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी येवला-लासलगाव मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मागणी केली आहे.
काय आहेत मागणी?
अजित पवार गटाचे नेते व येवला-लासलगाव मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की,
आपल्या येवला-लासलगाव मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आपण मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. 📌 येवला शिवसृष्टी ४ कोटी ९५ लक्षच्या उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात यावा.
📌येवला शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वाढीव… pic.twitter.com/VglOBF5K0q — Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 5, 2025
li>
छगन भुजबळ यांनी पत्र लिहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अनेक विषयांवर मी त्यांच्यासोबत चर्चा केली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भारत सरकारला पत्र लिहून अर्थिक मदत घेतली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांच्या कानी घातले आहे. आता जास्त धावपळ होत नाही. मात्र मी नाराज नाही. कांद्यावरचं निर्यात मूल्य, शिवभोजन थाळी योजना अशा अनेक गोष्टींवर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. दोन लाख लोक शिवभोजन थाळी योजनेचा फायदा घेत आहेत, त्यामुळे ती बंद करु नये,” अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती आमदार छगन भुजबळ यांनी दिली आहे.