रेवदंडा येथील महेंद्र खैरे या पाय वाटेने जाऊ नका, आंबे चोरीस जातात, असे खडसावीत भांडण केले. दोघांपैकी एकाने बंदुकीने दहशत निर्माण करण्याचे हेतूने नेम धरून गोळीबार केल्या प्रकरणी वळके येथील दोंघावर महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलिसांनी दोघावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वृत्त असे की, वळके येथील महिला फिर्यादी सिमा साईनाथ म्हात्रे हीे दि.7 मार्च रोजी दुपारी साडेतिनच्या सुमारास मुरूड तालुक्यातील वळके नजीकच्या चराटी जंगलभागातून लाकडे तोडून परत आली. जंगलभागातील पाउल वाटेवर वळके येथील प्रल्हाद काटकर यांने तिला हटकले व या पाय वाटेने जाउ नकोस, आंबे चोरीस जातात, असे खडसावीत भांडण केले. सदर वाटेने पुन्हा जाऊ नये यासाठी यावेळी दोघांपैकी प्रमोद काटकर यांनी प्रल्हाद काटकर यांच्या हाती बंदुक दिली, या बंदुकीच्या धाकाने महिला फिर्यादी या धावत सुटल्या, दरम्यान धावत पळत जाणार्या तिचेवर प्रल्हाद काटकर यांनी बंदुकीचा नेम धरून बंदुकीची गोळी तिचे दिशेने झाडली व दहशत निर्माण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत फिर्यादीने रेवदंडा पोलीस ठाण्यात महिला फिर्यादी सिमा साईनाथ म्हात्रे हिने दिलेल्या तक्रारीनुसार 34/2024 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बंदुकीची गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवीकलम 307, 506, 34 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (1), 25, 27 नुसार प्रल्हाद काटकर व प्रमोद काटकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरिक्षक श्रीकांत किरवले हे करत आहेत.