Photo Credit- Social media
मुंबई: भडकाऊ भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी मुस्लिमांना उघड धमकी दिली होती. मुस्लिमांना निवडून- निवडून मारणार असल्याची धमकी नितेश राणे यांनी दिली होती. या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर चिथावणीखोर भाषणे आणि हत्येच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ठिकाणी नितेश राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा श्रीरामपूर आणि दुसरा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. नितेश राणेंनी मुस्लिमांना खुलेआम धमक्या दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
हेदेखील वाचा: भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी; ‘या’ मोठ्या नेत्यांकडे पुण्याची जबाबदारी
रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर नितीश राणेंनी सभेत मुस्लिमांना उघडपणे धमकी दिली. ते म्हणाले, ‘आमच्या रामगिरी महाराजांविरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांची निवडून निवडून हत्या करू,’ अशी खुली धमकीच त्यांनी दिली होती. असे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांच्या पैगंबरावर केलेल्या टिप्पणीनंतर हा मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत महाराजांच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले. त्याच अनुषंगाने अहमदनगरमध्येही समस्त हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. याला भाजप नेते नितेश राणे यांनीही पाठिंबा दिला. जेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले तेव्हा त्याची सोशल मीडियावर नोंद झाली. त्यानंतर AIMIM नेते वारिश पठाण यांनी हा व्हिडिओ शेअर करत नितीश राणे जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.
हेदेखील वाचा: ‘या’ ठिकाणी आहे जगातील सर्वात लहान लँडिंग; लोक फ्लाईटचा वापर करतात बस सारखा