देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी (फोटो सौजन्य-X)
Ambabai and Jotiba temples News in Marathi: महाराष्ट्रातील भाविकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आले. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून म्हणजेच (14 मे) ड्रेस कोड लागू करण्यात आला. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक भाविक देवदर्शनाला जात असतात. याच भाविकांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यापासून कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. मात्र आता मंदिरात जाण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात देवस्थानांकडून परिपत्रकही जाही करण्यात आले.
अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर परिसरात येताना पारंपारिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकले जाईल असेच कपडे घालून यावे लागणार आह . लहान कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या ड्रेस कोडच्या नियमांचे पालन करावे लागेल. असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे. मंदिरात धार्मिक वातावरण, पावित्र्य आणि परंपरा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही समितीने म्हटले आहे.
महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी भाविकांना याबाबत आवाहन केले आहे. तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीकडून सोवळयाची देखील आता व्यवस्था केली जाणार आहे. सचिव शिवराज नाईकवाडे यांनी याबाबत ही माहिती दिली आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरांत अशाप्रकारचा नियम तयार करण्यात आला असे नाहीये. यापूर्वीही राज्यातील अनेक देवस्थानांनी अशाप्रकारचे निर्णय घेतला आहे. यापूर्वी अष्टविनायक गणपतीसह ५ मंदिरांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या ५ मंदिरांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. चिंचवड देवसस्थानकडून यापूर्वी यासंबंधित पत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली होती. विविध देवस्थान ट्रस्टकडून कपड्यांबाबत नियमावली लागू करण्यात आली आहे.
तसेच श्री करवीर निवासनी देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. या मंदिराचे महत्व फार आहे. भाविक धार्मिक विधींसाठी पारंपरिक कपडे परिधान न करता तोकड्या कपड्यांवर येतात. त्यामुळे मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर व पालन करुन पारंपारिक वेशभूषेत महिला व पुरुष भक्तांनी येवून सहकार्य करावे, असे व्यवस्थापन समिनीतीने पत्रकाद्वारे कळवले आहे.