संग्रहित फोटो
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात हिंदी सक्तीचे जे दोन जीआर काढले होते. ते राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते, ते रेशीमबागेतून आले होते. असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते, यावरुन फडणवीसांनी हर्षवर्धन कोण? सपकाळ? नया है वह…अशी प्रतिक्रीया दिली होती. फडणवीसांच्या प्रतिक्रीयेवरुन काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री फडवीसांवर हिंदी’चा प्रभाव किती खोलवर पोहेचलाय हे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या आरोपांप्रती पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर फडणवीसांनी अनाहुतपणे दिलेली.. ‘नया है वह’ ची प्रतिक्रिया” हिंदी सक्तीच्या मानसिकतेतुन दिसुन आली व मोदी-शहांच्या दमनशाही वृत्तीचा मुख्यमंत्र्यांना ‘वाण नाही पण गुण लागला’हे स्पष्ट झाल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले.
पुढे तिवारी म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमातील विनोबा भावें आदींचे सत्य, अहिंसा व निर्भयतेचे संस्कार लाभलेले नेते आहेत. साधी राहणी, ऊच्च विचारसरणी व नैतिक चारीत्र्याचे अधिष्ठान’ लाभलेले व सत्याची कास धरणारे नेते आहेत. हर्षवर्धन सपकाळांचे प्रती बोलण्यापुर्वी, भाजप’च्या ‘नवीन अध्यक्षां’च्या चारीत्र्याची माहीती स्वतः कडे गृह खाते असल्याने फडणवीसांकडे निश्चितपणे असेल मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, स्थानीक संस्था निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर भाजप’ला गुन्हेगारी कृत्याबाबत वादातीत अध्यक्ष नेमण्याची वेळ का आली? यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. अन्यथा भाजपच्या ‘नव्या प्रदेशाध्यक्षाचे’ काही गंभीर प्रकरण पुढे आल्यास.. ‘नया है वह’ सांगुन सुटका करण्याची आपणावर वेळ येऊ नये, असंही तिवारी म्हणाले.