लातूर : ऊस तोडणी करीत असलेल्या हार्वेस्टर मिशनमध्ये शाॅर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत हार्वेस्टरसह अडीच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना औसा तालुक्यातील वांगजी शिवारात घडली असून सदरील घटनेची नोंद भादा पोलिसात करण्यात आली आहे.
दरम्यान वांगजी शिवारात हिप्परगा येथील शेतकरी रघुनाथ केशव भोजने यांच्या शेतातील अडीच एकर ऊस विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेकडून तोंडणी सुरू असताना हार्वेस्टर मशीनमध्ये अचानक झालेल्या शाॅर्ट सर्किटने आग लागली.
या आगीत हार्वेस्टरसह अडीच एकर ऊस अक्षरश: जळून खाक झाला. यावेळी सदरील हार्वेस्टर मिशन आॅपरेटर तुकाराम व्यंकट भारती यांनी प्रसंगावधान राखत ऊसाच्या फंडातून बाहेर निघाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
[read_also content=”राज्यातील तब्बल ‘इतक्या’ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपीची रक्कम https://www.navarashtra.com/maharashtra/so-many-factories-in-the-state-paid-100-per-cent-frp-nrdm-262818.html”]
या घटनेत हार्वेस्टर मिशनचे सुमारे ८९ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी सदरील नुकसानीची माहिती हार्वेस्टर मालक हबीब महताब शेख यांनी भादा पोलिसात दिली असून या नुकसानचा पंचनामा भादा पोलिसांकडून करण्यात आला आहे.






