संग्रहित फोटो
सेलू : खवळलेल्या माकडाने हल्ला केल्याने तरुणी जमिनीवर कोसळून जखमी झाली. ही घटना सोमवारी (ता. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास सेलू शहरातील खोडके-लेआऊट येथे घडली. पूजा हरीचंद रायपुरे (28) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा ही घरी अंगणात उभी असताना तिच्या घराच्या छतावर तीन ते चार माकडं चढले. ती माकडांना हाकलायला गेली असता कळपातील एका माकडाने पूजाच्या अंगावर झडप घेतली. त्यात ती जमिनीवर कोसळल्याने तिचा हात फॅक्चर झाला. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ता प्रज्वल लटारे याला मिळताच त्यांनी जखमीला आपल्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणले.
तेथे डॉक्टरांनी उपचार करून हात फॅक्चर असल्यामुळे सेवाग्राम रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविले. शहरात माकडांनी हैदोस घातला असून, ते आता माणसांवरही हल्ले करायला लागले आहे, माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.