Worker dies after falling from roof (संग्रहित फोटो)
पाचगणी : नाशिक-मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या चौघांमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ येथील एकजण असल्याची माहिती दिली जात आहे. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दर्शन करून परतत असताना दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या इको गाडीला (एमएच ०२ सीव्ही ५२३०) भरधाव वेगाने आलेल्या सिमेंट कंटेनर (एमएच १५ जेडबल्यू १०९०) ने जोरदार धडक दिली. या धडकेत इको गाडी कंटेनरखाली चिरडली गेली.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar News: अर्धनग्न करत कामगाराला अमानुष मारहाण; जागीच मृत्यू; कारण अस्पष्ट
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता, की गाडीत बसलेले नित्यानंद जनार्दन सावंत (वय ६२), विद्या जनार्दन सावंत (६५), मीना जनार्दन सावंत (६८) तिघेही अंधेरी मुंबई आणि चालक दत्ता आंब्राळे (४२, रा. आंब्रळ, तालुका महाबळेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला.
दत्ता आंब्राळे गाडीवर होते चालक
या अपघातग्रस्त गाडीचा चालक दत्ता आंब्राळे हा होता. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने त्याच्या कुटुंबावर आघात झाला आहे. यामुळे आंब्रळ गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात त्याला आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्याच्यावर आंब्रळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातांच्या प्रमाणात होतीये वाढ
राज्यात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय दत्तात्रय जेधे (वय ३०, रा. जेधेवाडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष कराड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar: समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी…