Accused Arrested Within 18 Hours In Case Of Murder Of Maharashtra Banks Recovery Agent Action By Daund Police Nrpm
महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंट खून प्रकरणी १८ तासांच्या आत एका आपरोपीला अटक; दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुण्यातील महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंटचा धारधार हत्याराने भोकसून खून केल्याप्रकरणी दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संशयित आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे,ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली..
पाटस : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर पुण्यातील महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंटचा धारधार हत्याराने भोकसून खून केल्याप्रकरणी दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संशयित आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे,ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
दिपक रामदास लोंढे (वय-३७ वर्षे रा.वासुंदे ता. दौंड) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे येथील प्रवीण मळेकर (वय-५८) हे बँकेत रिकव्हरीचे काम करत होते. शुक्रवारी (दि.१) रोजी रात्री मोटारसायकलवरून बारामतीहून घरी येथे जात असताना दौंड तालुक्यातील वासुंदे जवळ एका अज्ञाताने धारदार हत्याराने भोकसून त्यांचा खून केल्याची घटना घडली होती. याबाबत मृत प्रवीण मळेकर यांचा मुलगा ऋषिकेश मळेकर यांनी दौंड पोलिसात दिली होती.त्यांच्या फिर्यादीवरन दौंड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
घटनेची माहिती मिळताच क्षणांचा विलंब न करता दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली होती. पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ आरोपीच्या शोध मोहिमेसाठी एक पोलीस निरीक्षक तीन पोलीस उपनिरीक्षक आणि १५ पोलीस कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली होती. अवघ्या १८ तासाच्या आत आरोपीला पकडण्यात पोलीसांना यश आले. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासा संदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या.
अशाप्रकारे करण्यात आला तपास
या खुनाचा सखोल तपास करताना पोलीसांनी त्या रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी केली, अनेकांशी विचारपूस केली. सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यावेळी तपासात त्या परिसरातच राहणाऱ्या एका इसमाकडून वारंवार वाहनांवर दगडफेक तसेच हुज्जत घालण्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचा सूक्ष्म तपास करताना पोलीसांनी श्वानपथक बोलावून आरोपीचा माग काढला. या अगोदरही दगड मारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार संबंधित आरोपी करत होता. काही तासांपूर्वीही आरोपीने गाडीवर दगड मारले होते. मागील एका गुन्ह्यात महिलेला आरोपीने धारदार हत्याराचा धमकी साठी वापर केला असल्याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या कारणामुळे केला खून
रस्त्याने जाणाऱ्या वाहनांमुळे मला त्रास होतो.जाणून-बुजून माझ्या अंगावर वाहने घालतात,असे सांगणाऱ्या एका आरोपीने त्रास होतोय या कारणावरून रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत वाद घालून हातातील धारदार सुरा मारला असून या घटनेत त्याचा जीव गेला आहे. घटनेचा शोध लावत दौंड पोलिसांनी आरोपी दिपक लोंढे याला गुन्हा दाखल करून जेरबंद केले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, अरविंद गटकुळ,तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, सागर म्हेत्रे, नितीन बोराडे, रवी काळे, अमीर शेख, संजय नगरे, अमोल देवकाते, शरद वारे, योगेश गोलांडे, महेश भोसले, किरण पांढरे, पोलीस जवान असिफ शेख, मंगेश ठिगळे, विजय कांचन, धिरज जाधव आदींनी ही कामगिरी केली.
Web Title: Accused arrested within 18 hours in case of murder of maharashtra banks recovery agent action by daund police nrpm