मुंबई : सध्या राज्यात वेदांत्ता प्रकल्पावरुन (Vedanta Project) राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) वेदांत प्रकल्प तसेच अन्य प्रकल्पावरुन सरकारला धारेवर धरताताना दिसत आहेत. दरम्यान, काल आदित्य ठाकरेंनी ज्या वडगाव मावळमध्ये वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प येणार होता, तिथे सभा घेत शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं वेदांत्ता प्रकल्प परराज्यात केल्याची टिका आदित्य ठाकरेंनी केलीय. तसेच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचे उद्योगमंत्र्यांनी माहितच नसल्यानं आदित्य ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान, कालच्या आदित्य ठाकरेंच्या टिकेला आता भाजपाने (BJP) सुद्धा प्रतिउत्तर दिलं आहे.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिकेला राहुल गांधींकडून जोरदार प्रतिहल्ला https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-hits-back-to-pm-narendra-modi-329550.html”]
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन बरोबर झालेले अग्रीमेंट आणि कंपनीला जागा दिलेले पेपर्स दाखवा, नाही तर हात जोडून महाराष्ट्राची खोटं बोललात म्हणून माफी मागा अशी मागणी भाजपा आमदार राम कदम (Ram kadam) यांनी केली आहे. पुढे बोलताना कदम म्हणाले की, खूप झाले खोटं बोलण्याची पण एक मर्यादा असते, स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडता. वाह रे वाह..वसुली बाज खोटारडे, आता होऊन जाऊ दे आर पार..कीं लडाई, आदित्य तुम्ही वेदांता फॉक्सकॉन सोबत केलेले अग्रीमेंट पेपर्स दाखवा. नाहीतर महाराष्ट्राची माफी मागा अशी मागणी कदमांनी केली आहे.