कल्याण डोंबिवली: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राज्यात शिंदे- फडणवीस सरकारच राहणार या निर्णयाने कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव पंढरीनाथ पाटील (Pandharinath Patil) यांनी केलेल्या संकल्पानुसार शुक्रवारी सकाळी डोंबिवली पूर्व येथील मानपाडा रोड, सागाव येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर (Pimpleshwar Mahadev Temple) येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आलं होतं. महाआरतीसाठी डोंबिवली शहर तथा कल्याण ग्रामीण परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहण्यासाठी संकल्प
डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकारी पंढरीनाथ पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहावेत यासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात संकल्प केला होता. न्यायालयाच्या या निकालानंतर आज शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पिंपळेश्वर शिव मंदिरात अभिषेक व महाआरती करण्यात आली.
डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख आणि माजी सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना जिल्हा संघटक, माजी नगरसेवक तथा कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील, कल्याण ग्रामीण सचिव बंडू पाटील, महाआरतीचे संयोजक तथा माजी नगरसेवक आणि पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे सचिव पंढरीनाथ पाटील, पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मोहन पाटील, उपसचिव अरुण पाटील, उपाध्यक्ष रतन म्हात्रे, सदस्य सुरेश पाटील, कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील, शिवसेना डोंबिवली उपशहर प्रमुख सुनील भोसले, उपशहर संघटक संतोष तळाशीकर, विभाग प्रमुख अमोल पाटील, उप-कार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, युवा सेनेचे जिल्हा पदाधिकारी योगेश म्हात्रे, रवी अंबो म्हात्रे, माजी नगरसेविका दिपाली पाटील, उमेश पाटील, विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, सचिन म्हात्रे, ॲड. स्वप्निल पाटील, प्रसिद्ध उद्योजक तेजस पाटील, सागरली गावचे शाखाप्रमुख रवी म्हात्रे, सुनील मालनकर सरिता शर्मा शाखा संघटक, उपविभाग संघटकसंगीता अमरे, प्रतीक्षा प्रकाश माने, प्रवीण बाबू पवार, वसंत सुगदरे, दीपक पारेख, आरती चव्हाण, प्रमिला मुरकुटे, कार्यालयप्रमुख प्रकाश माने आणि डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.