कोल्हापूर : आजच्या घडीला देशात नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पुढे नेणारा नेता दिसत नाही, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौल्हापूर दौऱ्यादरम्यान केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना विजयी करण्यासाठी मतदान करावे असे मत व्यक्त केले. हसन मुश्रिफांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांसह अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नूल वासियांनी केलेल्या स्वागताचे तोंडभरून कौतुक केले.
स्वागतावर मिश्कील टिप्पणी
नूल गावात झालेल्या स्वागताने अजित पवार भारावून गेले. या स्वागतावर मिश्कील टिप्पणी करीत, महिलांनी आणि मुलींनी आमच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केले. संपूर्ण रॅली मार्गावर सर्वांनी स्वागत केले. काहीजण तर पाकळ्या आम्हाला मारत होते आणि कसं मारलं म्हणून आनंद घेत होते. मिश्किल भाषेत नूल वासीयांचे स्वागताबद्दल आभार मानले.
हसन मुश्रिफांनाच पालकमंत्री करायचे होते
नूल वासियांच्या स्वागताने भारावून गेलेल्या अजित पवारांनी, हसन मुश्रीफांचीसुद्धा प्रशंसा केली. अजित पवार यांनी हसन मुश्रिफांचे कौतुक करीत आम्हाला हसन मुश्रिफांनाच पालकमंत्री करायचे होते. आम्ही त्यांना पालकमंत्री बनवल्याचा आम्हाला आनंद असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. आम्ही सत्तेत असताना कोल्हापूरचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे येत नव्हते, ते आता आल्याने आम्हाला याचा आनंद असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांचे प्रयत्नांना यश आल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
बहुजन समाजातील तळागाळातील लोकांची कामे व्हावी ही इच्छा
आमचा उमेदवाराला चांगले पद मिळावे अशी माफक इच्छा आमची असते. बहुजन समाजातील तळागाळातील लोकाचे कामे झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माणसे वाचविणे, सर्व प्रकारच्या सोयी देणे हे आमचे काम आहे. सत्ता येत असते, जात असते, कोणी ताम्रपट घेऊन येत नाही. आजच्या घडीला देशात नरेंद मोदी यांच्याशिवाय देशाला पुढं नेणारा नेता दिसत नाही. अनेक योजनेच्या माध्यमातून लोकांचा विकास केला. गडिंग्लज तालुक्यातील 95 गावे दुष्काळी गावात येतात, त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
सत्ता येत असते, जात असते, कोणी ताम्रपट घेवून येत नाही
बहुजन समाजातील तळागाळातील लोकाचे कामं झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माणसे वाचवंणं, सर्व प्रकारच्या सोयी देणे हे आमचे काम आहे. सत्ता येत असते, जात असते, कोणी ताम्रपट घेवून येत नाही. आजच्या घडीला देशात नरेंद मोदी यांच्या शिवाय देशाला पुढं नेणारा नेता दिसत नाही. अनेक योजनेच्या माध्यमातून लोकांचा विकास केला. गडहिंग्लज तालुक्यातील 95 गावे दुष्काळी गावात येतात, त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही काम करत असताना कोणाचा अवमान व्हावा किंवा त्रास व्हावा, अशी माझी किंवा माझ्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. इतरांना त्रास न होता आरक्षण मिळायला पाहिजे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. आजपर्यंत राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळाले नाही, पण आमची इच्छा होती, हसन मुश्रीफ हे पालकमंत्री व्हावेत, असेही ते म्हणाले
Web Title: Ajit pawars big statement at rally in kolhapur they said today country does not see a leader who can take country forward except narend modi nryb