कल्याण : पहिल्याच पावसात मुंबईत अनेक पाणी तुंबल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तराला मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत उपहासात्मक टोला लगावला आहे .आमदार पाटील यांनी साऱ्यांचाच पाऊस स्वागत करण्यासारखा नाही ना साहेब ,गळक्या घरांनी, तुंबलेल्या नाल्यांनी, कंबरभर पाणी साचल्या रस्त्यांनी, टपापर्यंत बुडालेल्या गाड्यांनी, भिजल्या अन्नाच्या संसारांनी काय म्हणून पहायचं तुमच्या ह्या वक्तव्याकडे ?असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे ..
काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले …याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत पाऊस आलाय, त्याचं स्वागत करा ..बदनाम करायला अजून वेळ आहे ना.. जिकडे नाले तुंबतील त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार जिकडे तुंबाणार नाही त्या अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात येईल असं वक्तव्य केलं होतं..
त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी केले ट्विट
#विषयबदलनको
साऱ्यांचाच पाऊस स्वागत करण्यासारखा नाहीए ना साहेब, गळक्या घरांनी, तुंबलेल्या नाल्यांनी, कंबरभर पाणी साचल्या रस्त्यांनी, टपापर्यंत बुडालेल्या गाड्यांनी, भिजल्या अन्नाच्या संसारांनी काय म्हणून पहायचं तुमच्या ह्या वक्तव्याकडे ?
#तारतम्य