File Photo : Jail
वर्धा : आनंदनगरचा रहिवासी जावेद खान मेहबूब खान पठाण (४०) (Javed Khan Mehboob Khan Pathan) खून प्रकरणातील तिन्ही आरोपींची न्यायालयाने कारागृहात रवानगी (court sent him to jail ) केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सर्व हत्यारे जप्त केली आहेत. जावेदच्या अंगावर धारदार शस्त्राने (With a sharp weapon on the limb) सुमारे ३६ खोल वार (36 shell blows) करण्यात आले होते. २२ जूनच्या रात्री ७.३० वाजता हे हत्याकांड समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद खान आणि आरोपी लियाकत अली हे दोघे जुने मित्र होते. मात्र जावेद खान तो दारूच्या नशेत घरात घुसून वादविवाद करीत होता. घटनेच्या दिवशीही तो लियाकत अली याचा घरी पोहोचला होता. तिथे त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. मात्र जावेदच्या या गैरकृत्यांना कंटाळून लियाकत अलीच्या मुलाने रागाच्या भरात जावेदवर शस्त्राने हल्ला केला. लियाकतने जावेदला मागून पकडले. त्यानंतर त्याच्यावर ३६ प्रकारे अमानुष हल्ला करण्यात आला. जावेदवर घटनास्थळी पोलिसांनी लियाकत अली, त्याचा पुतण्या सोनू आणि पत्नीला अटक करून २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळविली. तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
चौकशी अंती वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आले. पोलीस कोठडीची मु्द्दत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून तिघांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी एपीआय गणेश बैरागी अधिक तपास करत आहेत. उल्लेखनीय आहे की, आरोपी लियाकत अलीची गेल्या सहा महिन्यांपूर्वी शहरातून तडीफार केले होते. त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. तसेच दारू विक्रीचा व्यवसाय करत होता. मयत जावेद पठाण याच्यावरही पोलिसांत विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती असून, त्याच्यावर खुनी हल्ला, दरोडा, चाकू दाखवून पैशांची मागणी करणे, पिस्तुल बाळगणे असे गुन्हेही तो करत असे. दारूविक्रीचा व्यवसाय होता. हिंगणघाट येथेही त्याच्यावर गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल असून, शहर पोलिसांनी त्याच्याकडून दोन पिस्तुले जप्त केली आहेत.