Alleged Love Jihad Case In Manchar Stirs Up Massive Harassment Of A Girl By A Muslim Boy Nrab
मंचरमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाने खळबळ ; मुस्लिम मुलाकडून मुलीचा प्रचंड छळ?
पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा आरोप होतोय. एका अल्पवयीन मुलीला चार वर्षांपूर्वी मुस्लीम मुलाने फूस लावून पळवून नेल्याचा दावा केला जातोय. काही दिवसांपूर्वी हे तरुण-तरुणी मंचरमध्ये परतले, त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.
पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा आरोप होतोय. एका अल्पवयीन मुलीला चार वर्षांपूर्वी मुस्लीम मुलाने फूस लावून पळवून नेल्याचा दावा केला जातोय. काही दिवसांपूर्वी हे तरुण-तरुणी मंचरमध्ये परतले, त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबद्दल आज पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी मुस्लिम मुलाने मुलीचे प्रचंड छळ केल्याचा गंभीर आरोप केला.
गेल्या चार वर्षांत पीडित मुलीला मुलाच्या कुटुंबीयांना बुरखा घालण्यास भाग पाडले, गोमांस खाऊ घातले, नमाज पडण्याची सक्ती केली, तिला सिगारेटचे चटके दिले, असे अतिशय गंभीर आरोप पडळरकर यांनी केले आहेत. 22 मे 2019ला हे दोघे मंचर सोडून गेले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार ही दाखल केली. मात्र तिचा शोध लागत नव्हता. ते पसार झाले होते. महाराष्ट्रासह सुरत आणि उत्तरप्रदेशात त्यांनी चार वर्षे काढली. या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह केला. या दरम्यान ती सज्ञान झाली आणि मग दोघांनी कोर्ट मॅरेज करत निकाहनामा ही केला. त्यानंतर तब्बल चार वर्षानी ते मंचरमध्ये परतले. आठवड्याभरानंतर कुटुंबियांना ती गावात आल्याचं समजलं, त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितलं. मग पोलिसांनी तिला बोलावून घेतले आणि वैद्यकीय चाचणीसाठी तिला रुग्णालयात पाठवलं, तिथं डॉक्टकरांनी काही प्रश्न विचारले असता तिच्या बोलण्यातून हा घडला प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी जावेदला अटक केली, आणि कलम 363 सह कलम 376 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले.. सध्या जावेद येरवडा तुरुंगात आहे.
Web Title: Alleged love jihad case in manchar stirs up massive harassment of a girl by a muslim boy nrab