मोहफुलातून आदिवासींना मिळाला हक्काचा रोजगार; फक्त दारू नाही, तर हे पदार्थही बनतात
धारणी : जुन्या काळातील जंगलावर आधारीत आदिवासी कुंटुंबाच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्यामुळे, उपासमारीच्या सावटातून एकमेव उरलेल्या मोहफूल संकलन व्यवसायातून गरिबांच्या घराच्या चुली पेटवल्या जात असून, सध्या मोहफुल संकलनाचा रोजगार एप्रिल महिन्यात शेवटच्या टप्प्यात आला आहे.
साँग कंपोजर म्हणून करिअर कसं घडवावं? कमवाल बक्कळ पैसा आणि प्रसिद्धी
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मोहफुल संकलन करण्यात येते. फेब्रुवारी महिन्यात जंगलातील अनेक कुंटुंबे पहाटे उठून मोहफुल संकलनाला सुरवात करून हे मोहफुल उन्हात वाळायला घालून पावसाळ्यासाठी साठवून ठेवतात. या मोहफुलाचे सेवन करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा सध्याही सुरूच आहे. अनेक कुंटुंबे आता या मोहफुलाचे लाडू विक्रीतून आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करीत असल्याचे सुखद चित्र सध्या मेळघाटातील अनेक भागात पहायला मिळत आहे. सध्या मोहफुल संकलनाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक मोहफुल संकलन केले जाते. आयुर्वेदात मोहाफुला शरीरासाठी अतिशय पौष्टिक मानले जात असल्यामुळे या मोहफुलापासुन बनविलेल्या लाडूची शहरात मोठी मागणी आहे. मोहफुलपासून बनविलेल्या विविध पदार्थाची मोठी मागणी बाजारपेठत आहे. अमरावती येथील मेळघाट हार्टमध्ये मोहफुलपासून बनविण्यात आलेल्या लाडूला सहाशे रूपये दर सध्या मिळत असून; मोहफुलाच्या लोणचांची मागणीही वाढत आहे.
सध्या व्यापारी 35 रूपये किलो या मोहफुलाची खरेदी करीत असून; पावसाळ्यात या मोहफुलाचे भाव वाढून मोहफुलला चांगले भाव असतो. पण दोन वेळेच्या पोटापाण्यासाठी आदिवासी सहजासहजी मोहफुलाची साठवणूक करीत नाही. थेट बाजारपेठत विक्री करीत आहेत. लाडू आणि लोणचं बनविण्यासाठी वाढला मोहफुलांचा वापर सध्या एक-एक मोहफुल संकलनाची प्रक्रिया मोठी अवघड असल्यामुळे काही आदिवासी कुटुंबे मोहाच्या झाडाखाली साडी अंथरून मोहफुल गोळा करीत आहे. मोहफुलांचा वापर लाडू आणि लोणचे बनविण्यासाठी केला जात आहे. या वाळलेल्या मोहफुलाला कुंटुंब त्यात काजू, बदाम आणि जायफळाचे पावडर मिसळून हे पदार्थ तयार करीत आहे. मोहफुलाचा वापर केवळ मोहाची दारू बनविण्यासाठी होत नसून; मोहफुलांपासून एक चांगल्या रोजगाराची निर्मिती होत आहे.
वन्यप्राण्यांच्या सावटात संकलन
पहाटे जंगलात गेलेल्या आदिवासी मजुरांवर वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती असते. त्यात सर्वाधिक धोका मजुरांना अस्वलींचा असते. कारण अस्वलीचे मोहफुल आवडते खाद्य आहे. मोहफुलाचा सुंगध आल्यावर अस्वल मोहफुलाच्या झाडाच्या आजूबाजूलाच असते. मोहफुले संकलन करणाऱ्या अनेक मजुरांना वन्यप्राण्यांच्या हल्लात जीव गमवावा लागला आहे.
आंध्र प्रदेश शिक्षक भरती 2025: 16,347 पदांसाठी सुवर्णसंधी; त्वरित करा अर्ज
रोजगार मिळत असतो. त्यानंतर येथेरोजगाराची दुसरी साधने उपलब्ध नाही. मोहफुलावर प्रक्रिया करण्याचा एकाद प्रकल्प उभारला तर बरे होईल.
– प्रेमलाल कास्देकर, मजूर, बिबामल, ता. धारणी
जीव मुठीत घेऊन जंगलात मोहफुलाचे संकलन करताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची
भीती असते. मोहाफुलाचा एक चांगला रोजगार आहे. झाडाखाली अंथरूणासाठी पॉलिथीनची ताडपत्री मिळाली, तर हा रोजगार बहरून निघेल.
लालमन मेटकर, मजूर, दिग्दा ता. धारणी