Photo Credit : Social Media
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “जे काही घडले, त्याचे सर्व पुरावे आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे.मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. त्यात जयंत पाटीलयांचंही नाव आहे, असा आरोप सचिन वाझेंनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी खोट्या प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला होता. त्यांनी प्रतिज्ञा पत्रावर सही केली नाही म्हणून आपल्याला तुरुंगात टाकण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला होता.
या प्रकरणात मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केले आहेत. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व परावे सीबीआयकडे असल्याचे वाझेने म्हटले आहे. दरम्यान, 100 कोटी खंडणी प्रकरण, 2021 च्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझे तुरुंगात आहे. पण अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथी होेण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात बंद असून काल रात्री वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेताना त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.