म्हसवड : सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणदेशात आज मेंढरांची तोरण स्पर्धा आणि शर्यतीचे आयोजन मेंढपाळे तानाजी ढवाण यांनी केले होते. यावेळी दहिवडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, नगरसेवक तथा बांधकाम सभापती महेश जाधव, नगरसेवक सुरेंद्र मोरे, सोनबा गुंडगे, तेजस पवार, सुरेश तुपे, उपस्थित होते.
ही स्पर्धा माण तालुक्यातील दहिवडी या गावात भरवण्यात आली होती. जनावरांना लंपी त्वचारोगाची लागण होत असल्याने जनावरांच्या शर्यती आणि वाहतुकीला बंदी साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी घातली असल्याने पर्याय म्हणून मेंढ्यांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या.
[read_also content=”इको कारचा टायर फुटला; कार पलटी, बुलेटस्वार जखमी https://www.navarashtra.com/maharashtra/eco-cars-tire-burst-car-overturned-bullet-rider-injured-nrdm-324383.html”]
या स्पर्धेला सांगली, कोरेगाव, आटपाडी या भागातील मेंढपाळ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी मेंढ्यांची शर्यत लावण्यात आली होती तर बांबूच्या साहाय्याने बांधण्यात आलेले तोरणाला १० फूट उंच नारळ अडकवण्यात आले होते. मेंढ्यांनी उंच उडी मारून नारळाला स्पर्श केल्यास मेंढपाळास हजारांचे बक्षीस देण्यात आले.