महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह जाणाऱ्या आमदारांची आकडा 45 च्या वर पोहचला असून नव्याने सहभागी होणाऱ्य़ाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार ‘महा’संकटात सापडले आहे. सत्ता गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसणार असं म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे(Attempt by Congress, NCP to boost Shiv Sena’s morale).
विरोधी बाकावर बसण्याची तयारी करावी लागत नाही. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. त्यांना कोणताही हव्यास नाही. आमची सत्ता गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकार स्थापन झाले होते असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
सरकार आम्ही शेवटपर्यंत पडू देणार नाही, असाही विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखवला. त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहू आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारच आहोत, अशीही भूमिकाही त्यांनी घेतली.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेसनेही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्णयांवर विश्वास व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयात काँग्रेस उद्धव ठाकरेंना पाठिंबा देईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर आपला पक्ष विरोधी पक्षात बसण्यास तयार असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेनेचे आमदार फुटणं यामागे भाजपाचं आहे हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे, असे सांगत त्यांनी भाजपावर आरोपही केला.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]