BMC Election 2026: मुंबईत ठाकरे ब्रँड की शिंदेंची सत्ता...; 'त्या' ६९ मतदारसंघांत मुंबईकर कोणाच्या बाजूने ?
मुंबईतील ६९ मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे विरूदध एकनाथ। शिंदेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे. या ६९ मतदारसंघातील जास्तीत जास्त जागा मुंबईकर कोणत्या शिवसेनेच्या परड्यात टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा आणि विधानसभेत उयाठाकडून गददार, खोके सरकार अशा प्रकारची टीका करून शिंदेसेनेला हिणविण्यात आले होते. महापालिकेत मात्र हा सूर तेवढ्या प्रमाणात आळवलेला दिसून येत नाही. तसेच यावेळी महाविकास आघाडी देखील एकत्र नाही. काँग्रेसने आपली स्वतंत्र चूल मांडली आहे. पण राज ठाकरे सोबत आल्याने चाकरे ब्रेड एकत्र आला असून, उद्धव ठाकरेंना मनसेचे बळ मिळणार आहे. राज आणि उद्धव पहिल्यांदाच निवडणुकीत एकत्र आले आहेत.
मुंबई महापालिकेव्या २२७ जागांपैकी भाजपा-१३७, शिवसेना शिंदे ९०. शिवसेना ठाकरे- १६३, मनसे- ५३ अशा जागा लढवत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ मोठा असतो. तसेच महाविकास आघाडी देखील भक्कम होती. त्यामुळे त्यावेळी महाविकास आघाडीने बाजी मारली होती. पण विधानसभेत चित्र थोडे बदलले. ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना असा १० मतदारसंघात सामना झाला, त्यातील ७ जागा ठाकरे सेनेने जिंकल्या होत्या, महापालिका मतदारसंघांचे गणित वेगळे असते. अनेकदा उमेदवाराला पाहूनही मतदान होते. एकनाथ शिंदेंनी ९० मतदारसंघात आपली ताकद अजमावली आहे.
मनसेने तर राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच युती केली आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे सेनेला या पूर्णपणे नवीन आणि फ्रेश इक्वेशनला तोंड देण्यासाठी वेगळ्या प्रकारची रणनीती आखावी लागणार आहे. हिंदुत्व आणि मराठी या दोन्ही मुद्यांना एकत्र करत भाजपा आणि शिंदेसेना प्रचारावर जोर देत आहे. उद्धव ठाकरेंच्या मागे २५ वर्षांची ‘अँटी इन्कम्बन्सी’ असली तरी मनसेसारखा नवीन फ्रेश भिडू त्यांनी सोबत घेतला आहे.
पत्नीसह तुरुंगात असलेल्या विक्रम भट्ट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका, FIR रद्द करण्यास मिळाला
मुंबई, मुंबईत ठाकरे बंधूंची एकच भव्य आणि निर्णायक सभा शिवतीर्थावर होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चाना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, अनेक लहान-मोठ्या सभा घेण्याऐवजी शिवतीर्थावर एकच दणदणीत आणि प्रभावी सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली येथे सभेबाबत चर्चा सुरू असून, नाशिकमध्येही दोघे एका व्यासपीठावर येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. याशिवाय संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे स्वतः स्वतंत्र सभा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संयुक्त सभांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.






