औरंगाबाद- शहरातील सिडको परिसरात भाजपाच्या वतीने मनपा प्रशासनाच्या विरोधात भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला. सदरील मोर्चाला सिडको हडको परिसरातील नागरिकांचा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील सिडको-हडको परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून गेल्या पंधरा दिवसांपासून सदरील परिसरात नळांना पाणी येत नाही.
तर काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने आज नागरिक रस्त्यावरती उतरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. यात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला असून सदरील आंदोलन भाजपाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून या आंदोलनात सर्वसामान्य नागरिक, भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजपाच्या वतीने मनपा आयुक्त सतीश कुमार पांडे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले असून सदरील निवेदनात सिडको परिसरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात यावे. दूषित पाणी पुरवठा सुधारित करण्यात यावा सिडको परिसरात आतील नागरिकांवर ते मनपा प्रशासन करीत असलेले अन्याय बंद करण्यात यावे.
 
अशी विविध मागण्यांचे निवेदन आज रोजी सिडको हडको परिसरातील भाजपा शाखा च्या वतीने देण्यात आले आहे. सदरील आंदोलनाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता,
सदरील आंदोलनाचे पोलीस प्रशासनाच्या वतीने छायाचित्रण करण्यात आले आहे. सिडको परिसरातील पाण्याच्या टाक्या समोर चिस्तिया कॉलनी येथे हे आंदोलन आज रोजी संपन्न झाले आहे.