नागपूर : ‘दै. नवराष्ट्र’ यंदा 24 वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. यानिमित्त गुरुवारी 31 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात ‘चला दोस्तहो… आयुष्यावर बोलू काही’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन आहे. एस. के. एज्युकेशन कंसल्टंसी, ‘नवभारत नवराष्ट्र’ व लक्ष्मी बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम नागपूरकरांसाठी संगीतमय मेजवानीच ठरणार आहे.
गेली 20 वर्षे डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही लोकप्रिय जोडी रसिकांना आयुष्यावर बोलू काही या कविता, गाण्यांच्या मैफिलीला पुन्हा पुन्हा खेचून आणते आहे. आजच्या या तांत्रिक युगात मराठी कविता गाण्यांच्या या मैफिलीला ‘हाऊसफुल्ल’ चा बोर्ड पाहायला मिळणारा असा हा एकमेव कार्यक्रम ठरला आहे.
मराठी गीतांसह रंगणार सायंकाळ
संदीप खरे, डॉ. सलील कुलकर्णी यांची जोडी पुन्हा एकदा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. त्यांना आदित्य आठल्ये आणि रितेश ओहोळ साथ देतील. ‘मुंगी बाई मुंगी बाई, सिमेंटच्या या जगतात, कुठून मिळतो गं तुला मार्ग’, ‘देवा मला रोज एक…’, ‘चला जरा हळूहळू…’, ‘दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का मेठेपणी बाबा तुला आठवेल का ‘सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये यासारखे प्रेमगीत, बालगीत, चित्रपटाती गाण्यांची सुमधूर संध्या गुरुव नागपूरकरांना अनुभवता येणार आहे.
अभूतपूर्व ठरणार सोहळा
या जोडीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे रसिक किमान 50 ते 100 वेळा येऊन गेलेले असतात. चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही, ना मंजूर, दमलेल्या बाबाची गोष्ट. स्पायडर मॅन, मुंगी बाई, सारख्या असंख्य प्रकारच्या (प्रेम गीते, बालगीते, सिनेमातील गीते) कविता ही पाठ असतात. तरीही आजच्या कार्यक्रमात आपल्याला नवीन काहीतरी ऐकायला मिळणार याची त्यांना खात्री असते. कारण ही मंडळी कविता गाण्याच्या रूपात जे दान त्यांच्या ओंजळीत देणार असते. ते खूप अभूतपूर्व ठरते आणि एखादा नवीन रसिक जेव्हा या कार्यक्रमाला प्रथम हजेरी लावतो.
तो पुढच्या वेळी परत येईलच हे स्वतःच्या मनाशी ठरवून बाहेर पडतो. सतत सोशल मीडियावर उपस्थित राहणा तो रसिक मात्र त्याच सोशल मीडियाला आणि स्वतःला काही तास विश्रांती देऊन आयुष्यावर बोलू काहीला हजेरी लावतो. त्यावरूनच या कार्यक्रमाची उंची आणि त्याचा दर्जा लक्षात येतो.
हे आहेत कार्यक्रमाचे सहयोगी
झिरो डिग्री लाउंज, विको आणि व्हेइकल पार्टनर बीगॉस ईव्ही (अरोरा ऑटोटेक नागपूर) कार्यक्रमाचे सहयोगी आहेत. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी होत असल्याने प्रवेशासाठी निशुल्क प्रवेशिकाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिक माहिती व कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी 8180005300 आणि 7709355553 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.