बदलापूर प्रकरणानंतर शिक्षण विभाग जागं, सर्व शाळांमध्ये बसवणार पॅनिक बटन, मंत्री दीपक केसरकरांची घोषणा
बदलापूर येथील शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले आहेत. याप्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. याचदरम्यान आता बदलापूर प्रकरणी राज्य सरकारने एका समितीच स्थापना केली असून या समितीच्या अहवालावर बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
“एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला महिला आयोगाच्या अध्यक्ष, बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि आयजी पोलीस विभागाला विशेष मार्गदर्शक म्हणून बोलावलं आहे. याचा सविस्तर अहवाल उद्या प्राप्त होऊन बुधवारी यावर चर्चा करू”, असं दीपक केसरकर म्हणाले. त्यावेळी महाराष्ट्रातील एकमेव निर्णय जाहीर करु. याबाबत मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली आहे. आदिवासी विकास विभागाच्या शाळांवर आमचे थेट नियंत्रण नाही. शाळा प्रशासनाचे एकाच विभागावर पूर्ण नियंत्रण असावे. आमच्या शाळा जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग या दोन्हीच्या नियंत्रणाखाली आहेत. सीईओच्या स्तरावर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. शिक्षकांबाबतचे निर्णय शिक्षण विभागाला द्यावेत, असे दीपक केसरकर म्हणाले.
हे सुद्धा वाचा: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बदलापूर घटनेनंतर संपूर्ण व्यवस्था बदलण्यास सुरुवात होईल. कालच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मी राज्यमंत्री होतो तेव्हा मी एक प्रस्ताव सादर केला होता. आपण पॅनिक बटण शाळांमध्ये लावावं आणि महिलांना द्यावं. महिला आणि मुलं अडचणीत आल्यावर पॅनिक बटण दाबल्यास पोलिस ठाण्यात त्वरीत माहिती कळते. मग ट्रॅकिंग सिस्टममुळे पोलिसांपर्यंत ही संबंधित व्यक्ती कुठे गेली हे समजतं. ही सिस्टम ऑफलाईनही चालते. हैदराबादमधील एका कंपनीने हे बटण तयार केलं आहे. हे सुरू केलं तर अशा घटनांवर नियंत्रण येईल.”
हे सुद्धा वाचा: लालपरीची चाके थांबणार! गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलिंवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याच्या न्यायलयीन कोठडीत ही वाढ करण्यात आली. अक्षय शिंदे हा बदलापूरच्या आदर्श शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. तो 24 वर्षांचा आहे. शाळेत साफ सफाई करण्याबरोबरच लहान मुला-मुलींना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याचं काम तो करत होता. मुलं अक्षयला काठिवाला दादा म्हणून ओळखायचे. कंत्राटी पद्धतीवर अक्षयला बदलापूरच्या शाळेत नोकरी मिळाली होती.