मुंबई :अमरावतीच्या अपक्ष खासदार नवणीत राणा (Navneet rana) आणि त्यांचे पती व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना दिलासा मिळाला आहे. राणा दाम्पत्य आज सकाळपासून हनुमान चालिसा (Hanuman chalisa) प्रकरणी बोरिवली पोलीस (borivali police stations) ठाण्यात हजर होते. मात्र त्यांच्या चौकशीनंतर त्यांना आता जामीन मंजूर (bail granted) झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खासदार नवणीत राणा व रवी राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
[read_also content=”पेग्विंन सेनाप्रमुखांना मराठी माणसाला थापेबाजी, आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्व निर्माण करायचंय – आशिष शेलार https://www.navarashtra.com/maharashtra/ashish-shelar-press-conference-about-vedanta-target-to-aditya-thackeray-and-shivsena-326285.html”]
दरम्यान, खासदार नवणीत राणा व रवी राणा हे चार महिन्यापूर्वी मुंबईत येत हनुमान चालिसाबाबत आंदोलन केले होते. तसेच त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन आपण हनुमान चालीसा म्हणणार असं राणा दाम्पत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळं खासदार नवणीत राणा व रवी राणा यांच्या विरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज जामीनावर सुनावणी होती. या दोघांनाही जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळं या दोघांना दिलासा मिळाला आहे.